Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार

पुरामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे आलेल्या प

राज्यात गारठा वाढला पावसाची शक्यता
भारतीय उद्योगविश्‍वाचा पितामह काळाच्या पडद्याआड !
अगस्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त स्मरणिका होणार प्रकाशित

अहमदाबाद/वृत्तसंस्था : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पावसामुळे आलेल्या पुरामुळे या भागातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. पाऊ आणि पूर यामुळे आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अशामध्ये आता गुजरातमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गुजरातमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. या पूरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पूरामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. पूराचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस आणि पूरामुळे संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 102 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,119 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पंचायतीच्या मालकीच्या 271 रस्त्यांसह एकूण 302 रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसंच जवळपास 10 राज्य महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्गही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात सर्वाधिक 66 रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भावनगर जिल्ह्यात 57 आणि पोरबंदरमध्ये 47 रस्ते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, गुजरातमधील जुनागड शहरात आलेल्या पुरामुळे त्याचा पाया आणखीच कमकुवत झाला होता. त्यामुळे ही इमारत कोसळली. गुजरातमधील जुनागड शहरात शनिवारी 4 तासांत 10 इंच पाऊस झाला. यानंतर शहर जलमय झाले. दुसर्‍या दिवशी म्हणजे रविवारीही जुनागड पुराच्या पाण्यात बुडाला. अनेक भागांत शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली. जे भाग पाण्यात बुडाले होते, तेथील लोकांचे सर्व सामान उद्ध्वस्त झाले आहे. पुराच्या तडाख्यात आलेल्या शेकडो जनावरांचे मृतदेहही सापडले आहेत.

दोन मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले – गुजरातमधील जुनागडमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे काडियावल परिसरात एक इमारत कोसळली. ढिगार्‍याखाली 4 जण अडकले आहेत. ही इमारत भाजी मंडईजवळ होती आणि खाली दुकाने होती. भाजी मंडईमुळे येथे मोठी गर्दी असते. अशा स्थितीत अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. ढिगार्‍याखाली 12-15 लोक दबले गेल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे. पोलिस आणि एसडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत खूप जुनी होती. त्यात राहणार्‍या लोकांना महापालिकेने नोटीसही दिली होती.

COMMENTS