Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत यश

कोपरगाव .प्रतिनिधी ः शिक्षण महर्षी स्व. लहानुभाऊ नागरे आण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कोपरगांव या शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिरपेचात

संगमनेरमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांची अडवणूक
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत ’सेल्फी विथ व्होट स्पर्धा’

कोपरगाव .प्रतिनिधी ः शिक्षण महर्षी स्व. लहानुभाऊ नागरे आण्णा स्थापित रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कोपरगांव या शाळेच्या विद्यार्थिनींनी आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवत जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत 17  वर्षाखालील मुलींच्या संघात बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पारनेर या संघाचा 13-0 असा दणदणीत पराभव करून विजय मिळवला.
रेनबो स्कूलचे क्रीडाशिक्षक भामरे व विकास यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी करीत अतिशय देदीप्यमान यश संपादन करून अहमदनगर जिल्ह्यात रेनबो स्कूलचे नाव उंचावले आहे. संपूर्ण स्पर्धेमधील विविध फेर्‍या पुढीलप्रमाणे आहेत. प्रथम फेरीत पारनेर पब्लिक स्कूल बरोबर 8 गुणांनी विजय, उपांत्यपूर्व फेरीमध्ये मॉनफोर्ट स्कूल, सावळी विहीर बरोबर 4 गुणांनी विजय, उपांत्य फेरीमध्ये समता इंटरनॅशनल स्कूल,कोपरगावबरोबर 3 गुणांनी विजय, आणि अंतिम फेरीत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, पारनेर बरोबर 13 गुणांनी विजय मिळवला. मुलींच्या या यशस्वी संघात अदिती घुले, वैष्णवी घुले, हर्षाली राजपूत, हर्षदा शिंदे, संस्कृती गुरसळ, गौरी देशमुख, श्रेया वक्ते, दिव्या शर्मा, उन्नती पवार, इनाया पठाण या विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. विभागीय स्तरावर होणार्‍या स्पर्धेसाठी रेनबो स्कूलच्या मुलींचा संघ पात्र झाला आहे. संस्थेचे सचिव  संजय नागरे, कार्यकारी संचालक आकाश नागरे, संचालक नानासाहेब दवंगे, उपप्राचार्य निलेश औताडे, कार्यालय प्रमुख  रवींद्र साबळे, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विजेत्या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.शाळेच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष  कांतीलाल अग्रवाल, विश्‍वस्त मनोज अग्रवाल, आनंद दगडे  व वनिताताई नागरे आदी पदाधिकार्‍यांनी समाधान व्यक्त केले.

COMMENTS