Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी  

पुणे : राज्यात बुधवारी सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहु

मराठी विद्यापीठ येत्या जूनपासून होणार सुरू
अकोले शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
बदलापुरात माजी नगरसेवकावर हल्ला

पुणे : राज्यात बुधवारी सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये पावसाच्या सरी कोसळल्याचे दिसून आले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुतांशी भागात बुधवारी पहाटे मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. शहर व परिसरात 28 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ग्रामीण भागात पडलेल्या पावसामुळे रब्बी ज्वारीसह इतर पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

राज्याच्या काही भागात पुढील दोन ते तीन दिवस पाऊस होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झाला आहे. या कमी दाबामुळे राज्यात आणि देशाच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील दोन दिवस सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सोबतच गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पाऊस सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी वातावरण कोरडे किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

COMMENTS