Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाचा हाहाकार

मुंबईसह कोकणात पूरसदृश्य परिस्थिती ; शाळा-महाविद्यालयांना सुटी

मुंबई ः मुंबई, ठाणे आणि कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलीच दैना उडाली. या पावसामुळे सोमवा

राजकीय कार्यकर्त्यांचा अंधारातला प्रवास
मिल्लीयाची शेख अस्मत जहांँ हिचे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील गणित परिसंवाद स्पर्धेत यश
ब्राईट इंग्लिश मिडीयम स्कूल वाडीवऱ्हे विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

मुंबई ः मुंबई, ठाणे आणि कोकणासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने चांगलीच दैना उडाली. या पावसामुळे सोमवारी रेल्वेच्या लोकलसेवेसह इतरही सेवा कोलमडल्या होत्या. त्यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. तर दुसरीकडे अनेक शाळां आणि महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचे स्वरूप आले आहे.

सोमवारी देखील सकाळपासून देखील मुंबई, ठाणे, पालघर परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई महानगरात मध्यरात्री 1 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांत रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे. तब्बल 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे लोकल सेवेवर देखील परिमाण झाला आहे. पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसेच महाविद्यालयांच्या पहिल्या आणि दुसर्‍या सत्रासाठी सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने येथील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. तसेच मुंबईतील नोकरदार वर्गाला देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई उपनगरातील व पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना पहिल्या सत्रात सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. तर पावसाचा जोर वाढणार असल्याने दुसर्‍या सत्रातील शाळांसाठी देखील सुट्टी जाहिर करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. तर कामाला जाणार्‍या नागरिकांना आज घराबाहेर पडू नये आशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे. त्यांनी घरूनच काम करावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड येथे देखील जोरदार पाऊस सुरू आहे. कोकणात काही परिसरात ढगफूटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे येथील नद्यांना पुराचे रूप आले आहे. आज सकाळी किल्ले रायगडावर देखील ढगफुटीसदृश पाऊस झाला. किल्ल्यावरून जोरदार पाणी वाहत आहे. किल्याच्या महादरवाजातून देखील पाण्याचा मोठा लोंढा वाहत असून या लोंढयाच्या रौद्र रूपाचा व्हीडीओ व्हायरल आहे. यात अनेक पर्यटक अडकून पडले असून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतांना दिसत आहे. पर्यटकांनी एकमेकांना पकडले असून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. हे पर्यटक थोडक्यात बचावले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना खली उतरणे देखील कठीण होऊन बसले आहे. कसेतरी हे पर्यटक पावसाच्या पाण्याच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात गडकिल्ल्यांवर जाऊ ंनअसे असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा पुनर्वसन मंत्री व आमदारांना फटका – मुंबईत पावसाने जोरदार धुमाकुळ घातल्याचा फटका मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना देखील बसला. अधिवेशनासाठी जाणार्‍या मंत्री आणि आमदार यांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची रेल्वेगाडी ही ट्रॅकवरच उभी राहिल्याने त्यांनी गाडी सुटण्याची वाट न पाहता थेट रेल्वेट्रॅक वरून पायी चालणे पसंत केले. सोमवारी सकाळी 9.45 च्या दरम्यान हे दोघेही रेल्वे ट्रॅकवरून हातात सामान घेऊन पुढे उभ्या असणार्‍या दुसर्‍या रेल्वेगाडीत बसून त्यांनी मंत्रालय गाठले.

रायगड किल्ले परिसरात ढगफुटी  – रायगड किल्ले परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या किल्ल्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. किल्ले परिसरात जोरदार पाणी वाहत असून किल्ल्याच्या पायर्‍यांवरून देखील जोरदार पाणी वाहत आहे. या पायर्‍यांना धबधब्याचे रूप प्राप्त झाले असून या गडावर ट्रेकिंगसाठी गेलेले अनेक पर्यटक पायर्‍यांवर अडकून पडले आहेत. मात्र 300 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, किल्ले परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे हा किल्ला पर्यटनासाठी आजपासून बंद करण्यात आला आहे. तर रोपवे देखील बंद करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कार गेली वाहून – बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव-नांदूरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने खळखळायला लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून गेली. या कारमध्ये कुणीच नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबरीनने वाहून गेले आहे.

COMMENTS