Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीमती सोनकवडेंचा अधिकारी, कर्मचार्‍यांवर नोटीसींचा पाऊस

एक अधिकारी दोषी असेल, सगळेच कसे ? ः अधिकार्‍यांचा संतप्त सवाल

exclusive stamp. exclusive round grunge sign. label मुंबई/प्रतिनिधी ः कोणत्याही विभागाचे नेतृत्व जर योग्य नसेल तर, ते सर्रास विभागातील सर्वांनाच द

सामाजिक न्याय दिन ‘अन्याय दिन’ म्हणून साजरा करावा का ?
अ‍ॅट्रोसिटी कायद्याच्या बाबतीत राज्य सरकार उदासीन
नस्ती उपलब्ध नसल्यास शिस्तभंगाची कारवाई – शिक्षण उपसंचालक उकिरडे
exclusive stamp. exclusive round grunge sign. label

मुंबई/प्रतिनिधी ः कोणत्याही विभागाचे नेतृत्व जर योग्य नसेल तर, ते सर्रास विभागातील सर्वांनाच दोषी धरत सुटले, तसाच प्रकार औरंगाबाद येथील समाजकल्याण विभागात सुरू आहे. प्रादेशिक उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती जयश्री सोनकवडे यांना सध्या या विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी दोषी दिसायला लागले असून, त्यांनी सर्वांना नोटीसी काढण्याचा धडाका लावला आहे. श्रीमती सोनकवडे यांनी प्रादेशिक उपायुक्त पदाचा कार्यभार घेतल्यापासून या विभागातील चारही सहायक आयुक्तांना नोटीसा काढल्या आहेत. त्यामुळे एक अधिकारी दोषी असू शकतो, सगळेच अधिकारी दोषी कसे असू शकतात? याचाच अर्थ श्रीमती सोनकवडे या आपल्या पदाचा गैरवापर करून, अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप या अधिकार्‍यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना केला आहे.  

श्रीमती सोनकवडे यांनी प्रादेशिक उपायुक्तपदाचा पदभार घेतल्यापासून आपले अधिनस्त अधिकारी, कर्मचार्‍यांस सळो की पळो करुन सोडले आहे. त्यामुळे काही अधिकार्‍यांनी पदभार सोडले, काही बदल्या मागण्याच्या तयारीत आहेत. बीड येथील कर्तव्यदक्ष असलेले रवींद्र शिंदे यांच्याकडे तीन पदाचा कार्यभार होता व ते चांगल्या प्रकारे काम करत होते. त्यांना 20 ते 25 नोटीस देऊन त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला. त्यामुळे भीतीने त्यांनी सहाय्यक आयुक्त, बीडचा पदभार सोडून दिला. जालना येथे कार्यरत असलेले अमित घवले यांना 12 ते 25 नोटीस देऊन त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली. त्यामुळे त्यांनी रजेवर जाऊन सहाय्यक आयुक्त, जालन्याचे पदभार सोडून दिला. पांडूरंग वाबळे, सहाय्यक आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांनाही 10 ते 15 नोटीस देऊन विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवला त्यामुळे ते येथून बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. श्रीमती गीता गुट्टे यांनांही 20 ते 22 नोटीस देऊन विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे त्याही औरंगाबाद प्रादेशिक विभागाच्या बाहेर बदलीसाठी प्रयत्न करत आहेत. चारही सहाय्यक आयुक्तांना सळो की पळो करुन सोडले आहे. गृहपाल शरद वाघमारे, अप्पासाहेब होर्शिल, प्रविण सोळंखे, राजश्री पवार, समाजकल्याण निरीक्षक घनश्याम आंधळे, सतिष साळवे समाजकल्याण निरीक्षक आदींना अनेक शोकॉज नोटीसा देऊन त्रस्त केले आहे. काहीजण आजारी पडले तर काहीजण गुपचूप त्रास सहन करत आहेत. गृहपाल वैशाली बागल यांना अनेक नोटीस देऊन शेवटी त्यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दिली आहे. ही सर्व उठाठेव श्रीमती सोनकवडे ह्या सचिव सुमंत भांगे यांना बदलीसाठी 60 लाख रुपये दिल्यामुळे त्याच्या वसुलीसाठी सुरु असल्याची चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अधिकारी, कर्मचार्‍यांना 200 च्यावर नोटीसा दिल्यामुळे सर्वजण दहशतीखाली वावरत आहेत. या सर्व गोष्टींचा स्फोट होऊन अधिकारी कर्मचार्‍यांचे बळी जाण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घालून या विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांस संरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.

दोन कर्मचारी नोटीसा टाईप करण्यासाठीच – प्रादेशिक उपायुक्त कार्यालय औरंगाबाद येथील कर्मचारी शंकर माको व निलेश लकस यांना दोघांना फक्त नोटीसा टाईप करण्याचे काम दिले आहे. त्यामुळे सदर कर्मचारी देखील वैतागल्याचे दिसून येत आहे. एका दिवसांमध्ये किती नोटीसा काढाव्या याला देखील मर्यादा असाव्यात, मात्र नोटीसांचा पाऊस या विभागात पडतांना दिसून येत आहे.

अधिकारी, कर्मचार्‍यांचा मानसिक छळ सुरू – औरंगाबाद येथील समाजकल्याण विभागात सुरू असलेल्या नोटीसींचा खेळ जाणून घेण्यासाठी आम्ही या विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी संवाद साधून त्यातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपली कैफियत मांडत छोटया-छोटया कारणांवरून कारणे दाखवा नोटीसा देवून आमचा मानसिक छळ सुरू आहे. माझ्या मर्जीप्रमाणे कामकाज करा, अन्यथा तुमची हयगय नाही, असा इशारा श्रीमती सोनकवडे देत असल्याचा आरोपच या अधिकार्‍यांनी नाव न छापण्याच्या अटीवर केला आहे. तसेच विभागातील एक सहायक आयुक्त दोषी असेल, काही गृहपाल दोषी असतील, पण सगळेच सहायक आयुक्त, सगळेच गृहपाल दोषी कसे असतील असा सवाल करत या अधिकार्‍यांनी श्रीमती सोनकवडे यांना दोषी धरत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

COMMENTS