Homeताज्या बातम्यादेश

उत्तर भारतात पावसाचे 56 बळी

भूस्खलन, ढगफुटीसह विजांचे तांडव

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तरप्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलप्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आह

राजारामबापू कारखाना हुकुमशाहीचा अड्डा : धैर्यशील मोरे
सलमान खानचा ‘गजनी’ लूक व्हायरल
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

नवी दिल्ली ः गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तरप्रदेश, नवी दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचलप्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी झालेल्या ढगफुटीने नद्यांना पूर आला असून, अनेक ठिकाणी भूस्खलनांच्या घटना घडल्या आहेत. विविध घटनांमध्ये सोमवारपर्यंत 56 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये यामध्ये हिमाचल प्रदेशातील 34, उत्तराखंड 6, जम्मू आणि काश्मीर 4, पंजाब 3, यूपी 7, राजस्थान 1, दिल्ली 1, अशा एकूण 56 जणांचा मृत्यू झाला आहे. मनालीमध्ये 52 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना पुढील 24 तास घरात राहण्यास सांगितले आहे. राज्यातील अनेक नद्या आणि कालवे धोक्याच्या चिन्हावर आहेत. दोन ठिकाणी ढग फुटले आहेत. कुल्लूमधील बियासबरोबरच पार्वती आणि तीर्थन नद्यांनाही उधाण आले आहे. राज्यातील विविध भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहात 60 वाहने वाहून गेली. त्याचवेळी कुल्लूच्या कसालमध्ये 6 वाहने पाण्यात वाहून गेली. पंजाबमध्ये सतलज नदीजवळील 15 ते 20 गावे रिकामी करण्यात आली आहेत. त्याचवेळी लेह-लडाखमध्ये मुसळधार पावसामुळे 450 वर्षे जुने घर कोसळले. हिमाचलमध्ये 46 घरे उद्ध्वस्त झाली आहेत. देशातील एकूण पाऊस आता सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. 9 जुलैपर्यंत सरासरी 239 मिमी पाऊस झाला होता. आता हा आकडा 243 मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो 2% अधिक आहे.दिल्लीतील पावसाचा 41 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. गुरुग्राममध्ये रस्ते नद्या बनले. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ते धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.

दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मनालीमध्ये 52 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना पुढील 24 तास घरात राहण्यास सांगितले आहे. राज्यातील अनेक नद्या आणि कालवे धोक्याच्या चिन्हावर आहेत. दोन ठिकाणी ढगफुटी झाली आहे. पूर आणि पावसाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री आणि अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार प्रशासन आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम बचावकार्यात गुंतल्या आहेत.

दिल्लीत सोमवारी दिली शाळांना सुटी – दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये पावसामुळे सरकारी शाळेचा काही भाग कोसळला. दुसरीकडे सोमवारी दिवसभर पावसामुळे रस्ते जाम झाले होते. दिल्लीतील ग्रेटर कैलासमध्ये पावसामुळे सरकारी शाळेचा काही भाग कोसळला. सततच्या दोन दिवसांतील पावसामुळे रस्ते जलमय झाल्यामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दिल्लीत दुपारी 1 वाजेपर्यंत यमुनेची पाण्याची पातळी 204.63 मीटरवर पोहोचली. दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायालयाच्या खोलीत पाणी शिरल्याने त्यांना हलवण्यात आले.

COMMENTS