Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात काही भागात पावसाचा अंदाज

नागपूर : राज्यातील काही भागात सध्या तापमानवाढ तर, काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळ समुद्र किना

ईशा कोप्पीकरने टीम्मी नारंगशी घेतला घटस्फोट
पारनेर तहसीलदार ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लीपने राज्यात भूकंप; आत्महत्या इशार्‍याने खळबळ, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
पत्र्यांचे छत असलेल्या मतदान केंद्रांवर उन्हाच्या संरक्षणासाठी पाचट टाकावेत

नागपूर : राज्यातील काही भागात सध्या तापमानवाढ तर, काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. केरळ समुद्र किनार्‍यालगत तयार झालेल्या वातावरणीय प्रणालीमुळे राज्याच्या काही भागात पाऊस, तर काही भागात तापमानात वाढ होण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
वातावरणीय प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि लगतच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याचा जोर कमी झाला असून बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्याने राज्यभरात किमान तापमानात सरासरी एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. दक्षिण भारतात ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्यामुळे राज्यात पुढील तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळ किनार्‍याजवळ अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. ते कोकण किनार्यालगत आहे. त्यामुळे दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्यातील इतर भागात किमान किंवा रात्रीच्या तापमानात किरकोळ वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

COMMENTS