Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरसह कोकणात पावसाचा हाहाकार

चिपळूणमध्ये घरात-बाजारपेठेत-दुकानांमध्ये शिरले पाणी

मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेला पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्यामुळे नद्यांनी धोक्

नागपुरात ओमान एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
कोपरगाव मतदारसंघात उद्या 300 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
भाजप चालवतंय क्रिमिनल सिंडिकेट : संजय राऊत

मुंबई/कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेला पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढल्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोल्हापुरात पावसाचा चांगलाच जोर असल्यामुळे अनेक जिल्हे जलमय झाले आहे.  कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, तेथील नागरिकांनी स्थलांतिरत होण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. तर चिपळूणमध्ये वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अशातच आता चिपळुणातील बाजारपेठांमध्ये पावसाचं पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. चिपळूणमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. चिपळूणमधील बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे चिपळूण शहराला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. चिपळूण नाईक कंपनी परिसरामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. या परिसरात दुकानाच्या पायर्‍या पाण्याखाली गेल्या आहेत. बाजारपेठेमधील रस्ता देखील पाण्याखाली गेले आहेत. रत्नागिरीत जोरदार पाऊस होत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर चिपळूण शहराला पुन्हा एकदा पुराचा धोका संभवतो आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही मुसळधार पाऊस होतोय. खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड शहराला पुराचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर रायगड परिसरात मुसळधार पावसाळा सुरूवात झाली आहे. सततच्या पावसामुळे नद्याना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अशात सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

राज्यात 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा – राज्यात पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं देशभरात सगळीकडे पावसाची शक्यता आहे. राज्यात सगळ्या विभागातील पाण्याची तुट भरून निघेल हवामान विभागाचा अंदाज आहे. कोकण विभागात 25 ते 30 जुलैपर्यंत अतिवृष्टी इशारा देण्यात आला आहे.

पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी- राज्यातील सर्वच भागात पावसाचा जोर दिसून येत असून, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पुराचा चांगलाच फटका बसला आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने तीन तासांसाठी वाहतूक बंद होती. कोल्हापूरात देखील नद्यांच्या पाणी पातळीत मात्र वाढ सुरूच आहे. पंचगंगेने मंगळवारी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी आवश्यक त्या खबरदारी घेवून, नदीकाठच्या लोकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

जगबुडी नदीला पूर, 40 गावांचा संपर्क तुटला- खेड शहरातील जगबुडी नदी तुडुंब भरून वाहते.नदी किनारे असलेले वस्तीत जाणारे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. देवळा बंदराचे इथून जाणारा खाडीपट्ट्यातील चाळीस गावांचा संपर्क रस्त्यावर पाणी आल्याने तुटलेला आहे.या रस्त्याचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे.

COMMENTS