Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाचे थैमान सुरूच

कोल्हापूर, वर्धा, विदर्भात पूरस्थिती

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणीपातळीच प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पवासामुळे मोठे नुकस

एल निनो परिस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक 
सत्तासंघर्षाची लढाई निर्णायक वळणावर
भालाफेक सुवर्ण विजेता नीरज..मूळचा महाराष्ट्रीयन…

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून, पाणीपातळीच प्रचंड वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पवासामुळे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका कोल्हापूरला देखील बसला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील 22 मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत. नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे कोल्हापूरकडे जाणारे सहा राज्य मार्ग आणि 16 जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. याचा मोठा परिणाम हा वाहतुकीवर झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाने तूफान हजेरी लावली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली तसेच कोकणात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईकर तर तूफान पावसामुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबईत 204 मिमी पावसाची नोंद झाली. या पूर्वीही जुलै महिन्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली होती. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांमध्ये चांगली वाढ झाली आहे. हा पाऊस असाच सुरू राहिल्यास गेल्या काही दिवसांत ही धरणे पूर्ण भरण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबईत 24 तासांत 113.8 मिमी तर कल्याणमध्ये 122.3 मिमी पावसाची नोंद झाली. पालघरमध्ये 93 मिमी आणि अंबरनाथमध्ये 109.7 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला गेल्या काही दिवसांपासून मुळसधार पावसाने झोडपले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, मुंबई उपनगर या सोबतच ठाणे कल्याण परिसरात गेल्या 24 तासांत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 204 मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या 9 वर्षांच्या काळात जुलै महिन्यात तिसर्‍यांदा एवढ्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात देखील कोसळधार पाऊस सुरू आहे. यवतमाळ,  बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. उभे पीक पाण्यामुळे नष्ट झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात शनिवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे एक लाख हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. परिसरात रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्यापही अतिवृष्टीची दहशत या भागातील नागरिकांमध्ये आणि शेतकर्‍यांमध्ये आहे. संग्रामपूर शेगाव आणि जळगाव जामोद तालुक्यातील अनेक हेक्टरवरील पिके सध्या ही पाण्याखाली आहेत. तर संग्रामपूर शहरातील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. थोडक्यात म्हणजे संग्रामपूर जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात हे नुकसानीचे दृश्य दिसत आहे. गावात असो किंवा शेतात सगळीकडे काही ना काही प्रमाणात प्रत्येक नागरिकांचे या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त संग्रामपूर तालुक्याला बसला असून या तालुक्यात जवळपास 40 हजार हेक्टरवरील पिकाचं नुकसान झाले आहे. प्रशासनाने या तिन्ही तालुक्यात पंचनामे सुरू केले असून खासदार प्रतापराव जाधव यांनी या परिसराचा आज दौरा केला व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ मदत केल्या जाईल असे आश्‍वासनही त्यांनी दिले.

मुंबईमध्ये 24 तासांमध्ये 204 मिमी पावसाची नोंद – मुंबईला गेल्या काही दिवसांपासून मुळसधार पावसाने झोडपले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, मुंबई उपनगर या सोबतच ठाणे कल्याण परिसरात गेल्या 24 तासांत मोठ्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासात तब्बल 204 मिमी पावसाची नोंद झाली असून गेल्या 9 वर्षांच्या काळात जुलै महिन्यात तिसर्‍यांदा एवढ्या मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.

वर्धा नदीने ओलांडली धोक्याची पातळी – वर्धा नदीने रविवारी धोक्याची पातळी ओलांडली असून, नदीला पूर आल्याने नदीचे पाणी चंद्रपूर शहरात शिरले आहे. नद्या, नाल्यांना पूर आल्यामुळे शहरासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण या भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात 204 मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसर्‍यांदा जुलै महिन्यात चोवीस तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS