Homeताज्या बातम्यादेश

रेल्वेला मिळणार 40 हजार वंदे भारत बोगी

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पाच्या सुरुवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार सामान्य गाड्यांच्या

गणेशोत्सवापूर्वी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
एमआयडीसी जवळ झालेल्या अपघातात अनोळखी वृध्दाचा मृत्यू
टाळेबंदी असलेल्या पारनेर तालुक्यातील गावांना अत्यावश्यक सेवेला परवानगी द्यावी

नवी दिल्ली ः अर्थसंकल्पाच्या सुरुवातीस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी वाहतुकीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे. गेल्या 4 वर्षात आर्थिक विकासाला वेग देण्यात येत असून, युवाशक्ती तंत्रज्ञान योजना बनविण्यात येणार आहे. तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू केले जातील. पॅसेंजर रेल्वे गाड्यांचे कामकाज सुधारण्यात येईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार आहे. 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे.
सुमारे 40 हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे. याबरोबरच सरकारने 3 नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून, फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्याही वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सध्या देशात 149 विमानतळे कार्यरत आहेत. मालदीवबरोबर तणावपूर्ण संबंध असताना सरकारने अर्थसंकल्पात लक्षद्वीपला मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. लक्षद्वीपसह अनेक बेटांवर पर्यटनासाठी नवीन प्रकल्प जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली आहे. विशेष म्हणजे मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर सोशल मीडियावर मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकण्यात आला होता. यानंतर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने लक्षद्वीपला पोहोचू लागले आहेत. यासोबतच तीन मुख्य कॉरिडॉरमध्ये ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर आणि हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर यांचा समावेश आहे. हे नवीन कॉरिडॉर पीएम गती शक्ती उपक्रमांतर्गत ओळखले जाणार आहेत. याशिवाय हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉर जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्‍चित करण्यात मदत करतील, असेही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले आहे.

COMMENTS