Homeताज्या बातम्यादेश

देशातील रेल्वे ट्रॅक 3 ऑक्टोबरला करणार ठप्प

हरियाणातील महापंचायतीनंतर शेतकरी आक्रमक

नवी दिल्ली ः हरियाणामध्ये पुन्हा एकदा शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रविवारी कुरूक्षेत्र येथे झालल्या शेतकर्‍यांच्या महापंचायतीत 3 ऑक्टो

खटला रखडल्याने उच्च न्यायालय नाराज
दिव्यांगांच्या राज्य नाट्य स्पर्धेत “रिले” नाटक प्रथम 
जरे हत्याकांडाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालवा

नवी दिल्ली ः हरियाणामध्ये पुन्हा एकदा शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रविवारी कुरूक्षेत्र येथे झालल्या शेतकर्‍यांच्या महापंचायतीत 3 ऑक्टोबरला संपूर्ण देशभरात रेल्वे ट्रॅक रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलतांना शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, हरियाणात पंचायती घेऊन भाजपने शेतकर्‍यांवर केलेल्या अत्याचाराची आठवण करून दिली जाईल. रियाणातील भाजपच्या पराभवाचे शेतकरी भागीदार बनतील. यावेळी किसान महापंचायतीत सर्वनसिंग पंढेर यांच्यासह जगजित सिंग डल्लेवाल, अमरजीत सिंग मोहाडी यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते.
पिपली गावात झालेल्या महापंचायतीनंतर सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, भाजप सरकारने शेतकर्‍यांवर केलेल्या अत्याचाराचा बदला घेण्याची वेळ हरियाणात आली आहे. पंचायती घेऊन आम्ही हरियाणातील शेतकर्‍यांना शेतकर्‍यांवर बळाचा वापर कसा झाला आणि शेतकरी शुभकरन कसा शहीद झाला याची आठवण करून देत आहोत. त्याचवेळी शेतकरी नेते अमरजीतसिंह मोहाडी म्हणाले की, आमच्या आंदोलनाचा उद्देश इतर राजकीय पक्षांना इशारा देणे आहे की, त्यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांशी गैरव्यवहार केला तर शेतकरी एकजूट होऊन त्यांच्याविरोधातही लढा देतील. ते म्हणाले की, शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत. आगामी काळात हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. पिपली य झालेल्या शेतकरी पंचायतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसही सतर्क होते. यापूर्वी शेतकर्‍यांनी जिंदमध्ये महापंचायतही घेतली होती. या महापंचायतीमध्ये विविध राज्यातील शेतकरी आले आणि दिल्लीच्या सीमा खुल्या करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांबाबत विचारमंथन झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

शेतकरी आंदोलन तीव्र होण्याचे संकेत- हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी पिकांच्या किमान आधारभूत किमतीबाबत फेब्रुवारी-2024 पासून आंदोलन करत आहेत. अशा स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने हरियाणा सरकारने हरियाणा आणि पंजाबमधील अंबालाजवळील शंभू सीमा बॅरिकेड्स लावून बंद केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. पंजाबच्या दिशेने सीमेवर शेतकर्‍यांनी कायमस्वरूपी मोर्चेबांधणी केली. अशा स्थितीत तेथून वाहतूक बंद आहे. त्यामुळे अंबाला येथील व्यापार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर हरियाणात झालेल्या शेतकर्‍यांच्या महापंचायतीत 3 ऑक्टोबरला देशभर रेल्वे ट्रक ठप्प करण्याच्या निर्णयामुळे शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS