Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा रेल्वे स्थानकावर स्वातंत्र्यदिनी रेल रोको आंदोलन

जलद थांबा मिळण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव

पुणतांबा प्रतिनिधी - पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी र

चार महिलांमध्ये अस्वस्थता…धूमस्टाईल दागिने ओरबाडले
कोपरगाव नगरपालिकेत समस्यांचा पाऊस
कर्जत, जामखेड तालुक्याच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे

पुणतांबा प्रतिनिधी – पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा यासाठी ग्रामस्थांच्या वतीने 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते बुधवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत करण्यात आला. सरपंच स्वाती पवार सभेचे अध्यक्षस्थानी होत्या  रेल्वे प्रश्‍न तसेच जल स्वराज्य टप्पा दोन अंतर्गत पाणीपुरवठा ग्रामपंचायतकडे हस्तांतरण करून देण्यास ग्रामसभेत विरोध करण्यात आला ग्रामसभा पाणीपुरवठा योजना व रेल्वे प्रश्‍नावर तसेच घनकचरा संदर्भात झालेल्या विषयावर गाजली.
कोरोना काळापासून पुणतांबा रेल्वे स्थानकावर पॅसेंजर रोज जलद गाड्यांना थांबा बंद करण्यात आला, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पुणतांबा शिर्डी रेल्वे मार्ग झाला. त्यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी रेल्वेला दिल्या पुणतांबा रेल्वे स्थानकाला जंक्शनच्या दर्जा दिला. पुणतांबा शिर्डी रेल्वे मुळे गावाचा विकास होण्यास मदत होईल असे ग्रामस्थांना वाटले होते, पणत्यांच्या पदरी निराशा पडली. जंक्शनच्या दर्जा असला तरी एकच डेमो रेल्वे गाडी स्थानकावर थांबते, आता तर कोडलाईन मुळे पुण्याकडे जाणार्‍या रेल्वे सरळ जाणार आहे, त्यामुळे मुंबई पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय झाली तसेच व्यावसायिकांचे नुकसान झाले त्यामुळे पुणतांबा रेल्वे स्थानक शोभेची वस्तू बनली. केंद्रीय रेल्वेमंत्री व रेल्वेच्या वरिष्ठ विभागाकडे पाठपुरावा करून देखील प्रश्‍न सुटले नाही अखेर आज झालेल्या ग्रामसभेत रेल्वेचे प्रश्‍नासाठी 15 ऑगस्ट रोजी रेल रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत माजी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी ठराव मांडला अनुमोदन देण्यात आले. रेल्वे प्रश्‍नाच्या चर्चेत सर्जेराव जाधव भारत वहा डने गणेश बनकर अमोल सराळकर शिवसेनेचे महेश कुलकर्णी सुनील कुलट आदींनी भाग घेतला. रेल्वे प्रश्‍नावरच बराच वेळ चर्चा झाली तसेच. जलस राज्य टप्पा दोन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करण्यात यावी, असा विषय ग्रामसभेपुढे आला, त्यास विरोधी सदस्य श्याम धनवटे, सुनील थोरात, भूषण वाघ तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी विरोध केला. योजना अपूर्ण असताना ती हस्तांतरित करण्याचा डाव कशासाठी असा प्रश्‍न उपस्थित करून जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांचे उपस्थित विशेष ग्रामसभा घ्यावी असा ठराव मांडण्यात आला. आज झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधक यामध्ये शाब्दिक बाचाबाची तसेच छोट्या कुरबरी झाल्याच्या चौकशीवरून आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी गैरहजर असल्यामुळे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दीपक कुलकर्णी यांनी सचिव म्हणून काम केले. या ग्रामसभेला उपसरपंच निकिता जाधव ग्रामपंचायत सदस्य अनिल नळे, वैजयंती धनवटे, वंदना वाटेकर, जयश्री थोरात तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेला गैरहजर असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा ठराव मांडण्यात आला. कामगार तलाठी मंडळ अधिकारी विविध विभागाचे अधिकारी गैरहजर होते. गणेशचे माजी संचालक राजेंद्र थोरात चंद्रकांत वाटेकर संदीप धनवटे प्रकाश लोंढे संजय धनवटे विलास जगदाळे अशोक धनवटे महेश धनवटे मिराबाई पगारे तसेच आधी महिलांनी आपले प्रश्‍न मांडले.

COMMENTS