पुणतांबा ः पुणतांबा रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गुरूवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुमारे तीन तास रेल रोको आंदो

पुणतांबा ः पुणतांबा रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा मिळावा यासाठी गुरूवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुमारे तीन तास रेल रोको आंदोलन करण्यात आले शांततेत आंदोलन पार पडण्यात आले. रेल रोकोच्या आंदोलनामुळे पुणतांबा व परिसराची एकजूट दिसून आली. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अमरावती व महाराष्ट्र एक्सप्रेस या जलद गाड्यांना एक महिन्याच्या आत थांबा मिळेल तसेच झेलम व शिर्डी दादर या गाड्यांना देखील थांबा मिळेल तसेच शिर्डीला जाणार्या चार गाड्या यांना देखील थांबा मिळवण्यासाठी एक महिन्याच्या आत प्रयत्न केला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात शालेय विद्यार्थी महिला पुरुष शेतकरी तीन ते चार हजार नागरिक सहभागी झाले होते.
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळावा तसेच भुयारी मार्ग रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे पुणतांबेकरांचे म्हणणे होते त्यासाठी रेल्वेकडे अनेक वेळेस पाठपुरावा केला, मात्र रेल्वेने नुसते आश्वासन दिले पुणतांबा ग्रामस्थांनी एकजूट करून विशेष ग्रामसभा घेऊन 15 ऑगस्ट रोजी रेल रोको करण्याचा निर्धार केला होता त्यानुसार 15 ऑगस्ट रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर सर्व जन एकत्रित येऊन रेल रोको आंदोलनाला सुरुवात झाली या शालेय विद्यार्थी महिला पुरुष संख्येने सहभागी झाले होते आमच्या हक्काची रेल्वे थांबलीच पाहिजे अभी नही तो कभी नही या घोषणा देऊन आंदोलन रेल्वे स्टेशनकडे मार्गस्थ झाले. यावेळी व्यापार्यांनी आपली सर्व दुकाने ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. रेल रोको आंदोलनामुळे रेल्वे पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलन रेल्वे रुळावर जाऊन बसले हातात फलक घेऊन आमच्या हक्काची रेल्वे थांबली पाहिजे अशा घोषणा युवकांनी देऊन रेल्वे रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले. रेल रोको मुळे मुंबईहून येणारी वंदे भारत जलद गाडी कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबवली होती. तसेच पुण्याहून येणारी कर्नाटक एक्सप्रेस देखील जवळच्या स्टेशनला थांबवली होती. रेल्वे प्रशासन यांनी आंदोलकाची भूमिका जाणून घेतली. आमच्या सर्व जलद गाड्या थांबल्या पाहिजे या मागणीवर आंदोलन ठाम होते. रेल्वे व महाराष्ट्र पोलीस यांचे मध्यस्थी आंदोलकांशी चालू होती, लेखी पत्र मिळाल्याशिवाय तुमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला तोडगा काढल्याशिवाय पर्याय नव्हता.
लेखी आश्वासनानंतर रेल रोको अांदोलन घेतले मागे – रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आंदोलकांच्या संतप्त भावना पुणे डिव्हिजनल मॅनेजर यांना कळवल्यानंतर त्यांनी आंदोलकाशी मोबाईल द्वारे चर्चा केली त्यात पुणतांबेकरांच्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत असे सांगितले. तीन तासानंतर यावर तोडगा निघाला. रेल्वेचे वाणिज्य विभागाचे अशोक कुमार यादव यांनी पुणतांबा ग्रामपंचायतला लेखी पत्र दिले त्यात पुणे अमरावती महाराष्ट्र एक्सप्रेस जलद गाड्यांना एक महिन्याच्या थांबा मिळेल तसेच झेलम व शिर्डी दादर एक्सप्रेस या गाड्यांच्या थांब्यासाठी रेल्वे बोर्डाची चर्चा करून एक महिन्यात थांबा मिळेल तसेच शिर्डी ला जाणार्या चार गाड्यांना देखील थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करून तो थांबा दिला जाईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रेल रोको आंदोलन मागे घेण्यात आले.
COMMENTS