Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 माळीवाडा येथील दारु विक्री अड्ड्यावर छापा

अहमदनगर :  विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीची दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ८२५ रुपये किमतीची दा

काळीआई मुक्तीसंग्रामाच्या माध्यमातून आदिवासींच्या जमीनी मुक्त
श्रीगोंदा तालुका योग संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे
शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर

अहमदनगर :  विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीची दारु विक्री करणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत ८२५ रुपये किमतीची दारु जप्त करून एकास ताब्यात घेतले. ही कारवाई माळीवाडा येथील शिवम टॉकीजच्या भिंतीच्या आडोशाला सुरु असलेल्या अड्ड्यावर केली.

या बाबतची माहिती अशी की माळीवाडा येथील शिवम टॉकीजच्या भिंतीच्या आडोशाला एक इसम देशी बॉबी , संत्रा कंपनीच्या दारूच्या बाटल्या विकत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांचें आदेश सूचनेवरून त्या ठिकाणीं जाऊन खात्री केली असता तेथें एक इसम बसलेला दिसला त्याच्या पुढे एक खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स दिसून आला.पोलिसांची खात्री होताच पोलीसांनी तेथें छापा टाकला. पोलिसाना पाहताच तो इसम पळू लागल्याने पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहकले यांनी त्याला जागीच पकडले. त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यानें त्याचे नाव कुंदन रत्नाकर बनकर (वय ५४ राहणार पाटील हॉस्पिटल शेजारी,कोठी मार्केटयार्ड रोड, अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ ८२५ रुपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या अकरा बाटल्या मिळून आल्याने पोलिसांनी तो मुद्देमाल जप्त केला. कुंदन बनकर यास ताब्यांत घेतले.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुरज कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कुंदन बनकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली.

ही कारवाई पो नि दराडे यांच्या सूचनेवरून पोलिस नाईक अविनाश वाकचौरे, पोलिस कॉन्स्टेबल दिपक रोहकले, तानाजी पवार, सत्यजित शिंदे, सुजय हिवाळे, यांनी केली आहे

COMMENTS