राहुरी ः राहुरी पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. मीटिंगमध्ये
राहुरी ः राहुरी पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीत पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. मीटिंगमध्ये पोलीस पाटलांना कोणत्याही प्रकारचे गुन्हे घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्याबाबत कळविले.बीएम-एनबीडब्ल्यू वॉरंट बजावणीमध्ये पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच अल्पवयीन मुलींशी संबंधित गुन्ह्यामध्ये, अपहरण करण्यास, अत्याचारास मदत करणार्या आरोपीच्या मित्र, आई-वडील, नातेवाईक यांना आरोपी केलेे जाईल या बाबत सूचना देण्यात आल्या.
शिवजयंती उत्सवाबाबत माहिती घेऊन शिवजयंती उत्साहात आनंदात व शांततेत साजरी करण्याचे आव्हान करण्यात आले. तसेच दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी पोलीस पाटील मीटिंगमध्ये पोलीस पाटलांना लोकसहभागातून तथा ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ताहराबादचे पोलीस पाटील श्री किरण उदावंत यांनी ग्रामपंचायत ताहाराबाद शी समन्वय साधून ताहराबाद गावांमध्ये आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी इतरही गावातील पोलीस पाटलांनी तेही त्यांच्या गावातील ग्रामपंचायतच्या माध्यमातून तथा लोकसहभागातून सीसीटीव्ही बसून घेणार असल्याबाबत ग्वाही दिली. मंगल कार्यालय मालक यांचे मीटिंगमध्ये डीजे सिस्टीम ला असलेल्या बंदीबाबत अवगत करून साऊंड सिस्टिम बाबत आवाजाची मर्यादा पाळण्याबाबत सूचना केल्या. तसेच त्यांच्याकडे असणारे उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेरे रोडच्या अँगल मध्ये लावण्याबाबत सूचना केल्या व जिथे कॅमेरे नाहीत तेथे नवीन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना केल्या आहेत. सदर मीटिंग पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली
COMMENTS