Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी जिजाऊंच्या लेकींच्या जल्लोषाने दणाणली

शिस्तबद्ध शिवजयंती मिरवणूकीने डोळ्याचे पारणे फेडले

राहुरी/प्रतिनिधी ः शहरात रविवारी भव्य शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. राहुरी येथील मराठा बहुुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समित

नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू
सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24

राहुरी/प्रतिनिधी ः शहरात रविवारी भव्य शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. राहुरी येथील मराठा बहुुउद्देशिय संस्था संचलित मराठा एकीकरण समिती व विविध  सामाजिक संस्थाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजित करण्यात आले.राहुरी येथे शिवजयंती उत्सव समितीने नविपेठ येथे सकाळी 11 वा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले. दुपारी 3 वाजता लहान मुलांचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. त्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पंचधातूच्या मूर्तीचे पूजन करून पालखी मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.पालखी मिरवणुकीत महिलांचे जिजाऊ ढोल पथक हे मुख्य आकर्षण ठरले.या मिरवणूकित महिलांचा सहभाग मोठ्याप्रमाणावर दिसून आला.

पालखी मिरवणूक आनंदऋषीजी उद्यान येथून सुरवात होवून नविपेठ,शनी चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,शुक्लेश्‍वर चौक मार्गाने नविपेठेत समाप्त करण्यात आली.या पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.शुक्लेश्‍वर चौक मंडळाचे सचिन बोरुडे व सदस्यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत करत आरती केली. यावेळी शिवजयंती आयोजन समितीचे देवेंद्र लांबे म्हणाले की गेल्या पाच वर्षां पासून महिला भगिनींना शिवजयंती उत्सव समितीचे सर्व अधिकार देण्यात येत आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी महिलांचा सहभाग महत्वाचा आहे.आजच्या शिवजयंती मिरवणुकीचे नियोजन गेल्या दोन महिन्यान पासून चालू होते. राहुरी परिसरातील महिला व मुलींच्या उस्पुर्त प्रतिसादामुळे जिजाऊ ढोल पथक तयार करण्यात यश आले.या ढोल पथकाला वादन शिकवण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान देवळाली प्रवरा येथिल सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत.मराठा एकीकरण समितीची शिवजयंती शिस्तबद्ध असते त्यामुळे महिला मुलींनचा सहभाग मोठ्या प्रमाणार वाढत आहे.महिला मुली सुरक्षितातेचा एक विश्‍वास संपादन करण्यात मराठा एकीकरण समितीचे सदस्य यशस्वी होत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमाचे गेल्या निलांबरी कुंभार, वर्षा लांबे यांनी केले. पालखी मिरवणुकीचे नियोजन शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष जयश्री घाडगे, वैशाली शेळके, सुरेखा माकवणे, विद्या आरगडे, संगीता दारंदले, रिसबूड, जाणका लबडे यांनी पाहिले.

राहुरी पोलिस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भोजनाचे नियोजन मधुकर घाडगे यांनी पाहिले. शिवजयंती मिरवणूक यशस्वी होण्यासाठी मराठा संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, राजेंद्र लबडे, महेंद्र शेळके, अविनाश क्षीरसागर, संदीप गाडे, कुलदीप नवले, दिनेश झावरे, विनायक बाठे, सागर पाटील, अरुण निमसे, ईश्‍वर गाढे, धनंजय नरवडे, बाबा भोगडे, विक्रम गाढे, रविंद्र तनपुरे, अरुण निमसे, विनीत तनपुरे, किरण डुकरे यांनी प्रयत्न केले.

COMMENTS