देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चच्या वतीने फातिमा माता चर्च धर्मग्रामातील राहुरी फॅक्टरी, गुहा, ताहराबाद, देवळाली प्रवरा, ल

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्चच्या वतीने फातिमा माता चर्च धर्मग्रामातील राहुरी फॅक्टरी, गुहा, ताहराबाद, देवळाली प्रवरा, लाख, येथील विविध शाळांत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. राहुरी फॅक्टरी येथील फातिमा माता चर्च येथे रविवार दि.9 जुन रोजी राहुरीच्या नायब तहसीलदार पुनम दंडीले व फातिमा माता चर्च चे प्रमुख धर्मगुरू फा. प्रकाश राऊत यांच्या हस्ते 10 वी व 12 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान पत्रक व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नायब तहसीलदार पुनम दंडिले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत करियर करायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन कसे करावे व अभ्यास कश्या पद्धतीने करावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय संसारे, वसंत सांगळे, प्रवीण पाळंदे, सुभाष संसारे, प्रताप पाळंदे, सुरेश बागुल, शरद साळवे, प्रमोद काळपुंड, सागर पाळंदे, पप्पू बोर्डे, जॉन चाबुकस्वार, पत्रकार आशिष संसारे, नेल्सन कदम आदी प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाळंदे यांनी केले तर आभार नेल्सन कदम यांनी मानले.
COMMENTS