धर्मांतरप्रकरणातील कमलसिंगवर राहुरीत गुन्हा दाखल ; पोलिस घेत आहेत शोध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धर्मांतरप्रकरणातील कमलसिंगवर राहुरीत गुन्हा दाखल ; पोलिस घेत आहेत शोध

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणी राहुरी पोलिसांनी संबंधित कमलसिंगवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला

आमदार व नगराध्यक्षना प्रसिद्धीची हौस नाही- नगराध्यक्ष वहाडणे
औद्योगिक क्लस्टरच्या अडचणी केंद्र सरकार सोडवणार : गड़करी
सविता कुंभार यांना श्रीसंत गोरा कुंभार साहित्य पुरस्कार प्रदान

अहमदनगर/प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील गाजत असलेल्या धर्मांतर प्रकरणी राहुरी पोलिसांनी संबंधित कमलसिंगवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे धर्मांतर प्रकरणाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी आधी गुन्हा दाखल करण्यास नकार मिळाला होता. मात्र, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि खासदार अमर साबळे यांच्या दणक्यानंतर जिल्हा प्रशासन व पोलिस दलाने राहुरीत धर्मांतर करणार्‍याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने तोही चर्चेचा विषय झाला आहे.
या प्रकरणाशी संबंधित महिला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. कमलसिंग हा 3 एप्रिलला या महिलेच्या घरी गेला. तिला एका विशिष्ट धर्मात येण्याचा आग्रह धरला. धर्मांतर केल्यास तुम्हाला प्रति महिला दोन हजार रुपये मिळतील, घरातील देवांच्या मूर्ती पाण्यात विसर्जित करा, असे सांगून धर्मांतरासाठी कमलसिंगने त्या महिलेला एका चारीजवळ नेले. चारीतील पाण्यात महिलेला उतरण्यास सांगून तिचाशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारानंतर महिला तेथून निघून जाऊन गावात आली आणि तिथे तिच्याबरोबर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कमलसिंग नावाच्या व्यक्तीकडून होत असलेल्या धर्मांतराच्या प्रचाराला वाचा फुटली. कमलसिंग (सध्या रा. ब्राह्मणी, ता. राहुरी, मूळ रा. पंजाब) याच्याविरुद्ध संबंधित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नार्हडा तपास करत आहेत. राहुरी पोलिस कमलसिंगच्या शोधात आहेत.

आ. राणेंनी घेतली दखल
ब्राह्मणीतील धर्मांतर प्रकरणाची दखल घेऊन काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे आणि खासदार अमर साबळे यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन राहुरीतील या धर्मांतराच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले व या प्रकारावरून जिल्हा प्रशासनाला त्यांनी धारेवर धरले होते. आता याप्रकरणी संबंधित महिलेची राहुरी पोलिसांत फिर्याद दाखल झाली आहे. धर्मांतर करण्याचा आग्रह करून लज्जास्पद वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

COMMENTS