श्रीगोंदा :- राहुल विद्यार्थी वसतिगृहातून बहुजन चळवळीला गती देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन पत्रकार चंदन घोडके यांनी केले ते वसतिगृहात आयोज

श्रीगोंदा :- राहुल विद्यार्थी वसतिगृहातून बहुजन चळवळीला गती देण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन पत्रकार चंदन घोडके यांनी केले ते वसतिगृहात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार राजू शेख होते. यावेळी पत्रकार मनीषा घोडके, अमर घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, या वसतिगृहामध्ये सर्व जाती–धर्माचे मुले गुन्ह्या गोविंदाने राहतात. राहुल विद्यार्थी वसतिगृहाचा इतिहास मोठा आहे. वसतिगृहाच्या माध्यमातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडले आहेत. त्यांनी वसतिगृहाचे नवनिर्मितीसाठी योगदान देणे काळाची गरज आहे. देशसेवेसाठी जवान आपल्या प्राणाचे बलिदान देतात. त्याचप्रमाणे मीही माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत वंचित घटकांना न्याय देण्यासाठी लढतच राहणार आहे. वसतिगृहासाठी वेळोवेळी मदत करणार असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ओहोळ यांनी केले तर सम्यक गायकवाड याने आभार मानले.
COMMENTS