Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींचा ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँग्रेस नेते राहुल गांधी बर्‍याचदा सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कधी ते विद्यार्थ्यांना भ

‘भाईयो और बहनो…’ म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दिलासा
राहुल गांधींच्या अडचणीत वाढ, कोर्टाकडून याचिका फेटाळली

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः काँग्रेस नेते राहुल गांधी बर्‍याचदा सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. कधी ते विद्यार्थ्यांना भेटतात तर कधी बाजारातील विक्रेत्यांसोबत गप्पा मारताना दिसतात. राहुल गांधीचा हाच अंदाज अनेकांना खूप आवडतो. राहुल गांधींनी सोमवारी रात्री ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंत प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी स्वत: ट्रक चालवला. ऐवढंच नाही तर ट्रक चालकांसोबत गप्पा मारुन त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
राहुल गांधीच्या ट्रक प्रवासाचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. काँग्रेसने ट्वीट करत असे लिहेले आहे की, ’लोकनेते राहुल गांधी ट्रक चालकांची समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचले. राहुलजींनी त्यांच्यासोबत दिल्ली ते चंदीगढ असा प्रवास केला.’ या ट्वीटमध्ये पुढे काँग्रेसने असे देखील लिहिले आहे की, ’भारतामध्ये जवळपास 90 लाख ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांना अनेक समस्या आहेत. त्यांच्या ’मन की बात’ ऐकण्याचे काम राहुल गांधींनी केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राहुल गांधी यांनी हा ट्रकने प्रवास केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून काँग्रेसच्या नेत्यांपासून कार्यकर्ते हा व्हिडिओ शेअर करत त्यांचे कौतुक करत आहेत. राहुल गांधींनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेची सुरुवात 7 सप्टेंबरला कम्याकुमारीपासून झाली होती. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी 12 राज्यातून प्रवास केला. जानेवारीमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ही यात्रा संपली. राहुल गांधींनी या यात्रेच्या 136 दिवसांमध्ये तब्बल 4000 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला.

COMMENTS