Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींची खासदारकी रद्द

लोकसभा सचिवालयाची कारवाई ः काँगे्रसचे देशभर आंदोलन

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथील सभेत सगळया चोरांचे

आसाममध्ये भारत न्याय जोडो यात्रेदरम्यान गोंधळ
आदिवासी भागात अनुसूचित जाती, ओबीसी आरक्षणाला कात्री
जिल्हा न सोडण्याच्या अटीवर त्या चौघींना जामीन ; डॉ. विशाखा शिंदेंसह तीन परिचारिकांना मिळाला दिलासा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी काँगे्रस नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथील सभेत सगळया चोरांचे आडनाव मोदी कसे काय असा सवाल केला होता. त्यानंतर भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर शुक्रवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे लोकसभेतील खासदारकीचे पद रद्द केल्यामुळे खळबळ उडाली असून काँगे्रसकडून देशभर आंदोलने करण्यात येत आहे.  
लोकसभा सचिवालयाच्या कारवाईनंतर काँगे्रससह विरोधकांना हा मोठा धक्का मानला जात आहे. केरळच्या वायनाडमधील काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने 30 दिवसांचा वेळ दिला असला तरी शिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनही दिला आहे.

लालू प्रसाद, फैजल यांची खासदारकी यापूर्वी रद्द – न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर खासदारकी रद्द होणारे राहुल गांधी प्रथम नेते नव्हेत. कोर्टाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवल्यानंतर त्यांची विधानसभेची अथवा लोकसभेची सदस्यता रद्द करण्यात आली होती. या यादीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचे देखील नाव आहे. लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांची सदस्यता रद्द करण्यात आली होती. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर एक खटला सुरू होता. या खटल्यात त्यांना केरळमधल्या एका सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन दिवसांनी लोकसभा सचिवालयाने त्यांना संसदेतून बाहेरचा रस्ता दाखवला.

अपात्रतेसाठी भाजपने सर्व पद्धती वापरल्या ः खरगे – भाजपने राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी सर्व पद्धती वापरल्या. जे खरे बोलत आहेत ते त्यांना आवडत नाहीत, पण आम्ही खरे बोलत राहू. राहुल यांचे विधान कोणत्याही समाजाशी संबंधित नाही, जे लोक पैसे घेऊन पळून गेले, ललित मोदी, नीरव मोदी, विजय मल्ल्या, ते मागास समाजातील होते का? असा सवाल काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

आवाज दाबण्यासाठी सरकार नवे तंत्र शोधतेय ः काँगे्रसची टीका – काँगे्रस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँगे्रसकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, केंद्र सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. काँग्रेसने देखील सरकारच्या निर्णयावर टीका केली असून हा लोकशाहीवरचा घाला असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधींच्या कारवाईवरुन सरकारला धारेवर धरले.  सिंघवी म्हणाले, राहुल गांधींवर आधी राजकीय कारवाई करण्यात आली त्यानंतर कायद्यानं त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यचा प्रयत्न झाला. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत कारण हा भारतासाठी, सर्व राजकीय पक्षांसाठी, सर्व पक्षांच्या नेत्यांसाठी हा सर्वात मोठा राजकीय प्रश्‍न आहे. हा राजकीय मुद्दा आहे कारण हा पद्धतशीरपणे लोकशाही संस्थांवर घाला आहे. बदनामी करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अपवाद आहे, हे मान्य आहे. पण गेल्या काही वर्षात आपण काहीही विचार न करता अशा प्रकारे वारंवार झाल्याचं पाहिलं असेल. राहुल गांधींचा आवाज दाबवण्याचा हा प्रयत्न असून लोकशाहीवरचा घाला असल्याची टीका त्यांनी केली.

COMMENTS