Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखले

गुवाहाटी ः भारत जोडो न्याय यात्रेच्या नवव्या दिवशी सोमवारी राहुल गांधी आसाममधील नागाव येथे पोहोचले. बोर्डी पोलीस ठाण्यातील संत श्री शंकरदेव यांच्

नगरच्या महावितरण विभागातील किसान भीमराव कोपणार यांच्याकडून दलित ठेकेदाराला जातीवाचक शिवीगाळ..
पिंपरी चिंचवड महापालिकेला मालमत्ता करातून 910 कोटी तिजोरीत
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी तर्फे जाहीर निषेध

गुवाहाटी ः भारत जोडो न्याय यात्रेच्या नवव्या दिवशी सोमवारी राहुल गांधी आसाममधील नागाव येथे पोहोचले. बोर्डी पोलीस ठाण्यातील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी ते येथे आले होते, मात्र त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सुरक्षा दलांनी राहुल आणि इतर काँग्रेस नेत्यांना बाहेर रोखले.
मंदिराबाहेर राहुल गांधी आणि सुरक्षा दलांमध्ये वादावादी झाली. यानंतर यात्रेतील सर्व नेते ठिय्या आंदोलनाला बसले. सर्वांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी 3 वाजता मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे. यादरम्यान राहुल म्हणाले, मी असा काय गुन्हा केला आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही? मंदिरात कोण जाणार हे पंतप्रधान मोदी ठरवणार का? आज एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते का? काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, राहुल गांधी यांना 11 जानेवारीपासून येथे यायचे होते. यासाठी आमच्या दोन आमदारांनी मंदिर व्यवस्थापनाची भेटही घेतली. आम्ही 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता इथे येऊ असे सांगितले होते. आमचे स्वागत केले जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र आम्हाला मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याचेे रमेश यांनी म्हटले  आहे.

COMMENTS