Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधी 22 तारखेला गुजरात दौर्‍यावर

पक्षाच्या भारत-जोडो यात्रेतून घेणार विश्रांती

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) आगामी 22 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या दौर्‍यावर जाणार आहेत. राहुल सध्या पक्षाच्या भारत ज

राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते
राहुल गांधींना सूरत कोर्टाने दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
राहुल गांधींना दिलासा नाहीच

नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) आगामी 22 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या दौर्‍यावर जाणार आहेत. राहुल सध्या पक्षाच्या भारत जोडो यात्रेत असून यात्रेतून विश्रांती घेत ते गुजरातला निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. गुजरातमध्ये येत्या 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यावेळी गुजरातमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भाजप यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस भाजपला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी निवडणुकीत आम आदमी पक्षही मैदानात उतरून दोन्ही पक्षांना टक्कर देताना दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार न केल्याबद्दल राहुल गांधी यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता हिमाचलमधील निवडणुका संपल्याने काँग्रेसने गुजरातवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढील काही आठवड्यांमध्ये, काँग्रेसच्या प्रमुख पक्ष नेत्यांनी मतदानाच्या केंद्रस्थानी असलेल्या राज्यात अनेक प्रचार रॅली नियोजित केल्या आहेत. या अंतर्गत, पक्षाकडून येत्या 15 दिवसांत एकूण 25 मेगा रॅलींचे आयोजन करण्यात येईल. ज्यामध्ये 125 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. काँग्रेसच्या या आक्रमक रॅली निवडणुकीच्या रणनीती अंतर्गत असतील, ज्यामध्ये पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होतील.

COMMENTS