Homeताज्या बातम्यादेश

मणिपुरमध्ये राहुल गांधींनी घेतली पीडितांची भेट

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या दोन महिन्यांपासुन सुरु असलेला हिंसाचार अजूनही थांबण्याची चिन्हे नसून, काँगे्रस नेते राहुल गांधी दोन दि

देश लोटस चक्रव्युहात अडकला
संपूर्ण भारत देशच माझे घर
Rahul Gandhi : मारा, गाडा काहीही करा, पण शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरणारच (Video)

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या दोन महिन्यांपासुन सुरु असलेला हिंसाचार अजूनही थांबण्याची चिन्हे नसून, काँगे्रस नेते राहुल गांधी दोन दिवसाच्या मणिपूर दौर्‍यावर आहेत. गुरुवारी त्यांचा ताफा अडवण्यात आला होता, त्यामुळे पीडितांची त्यांना भेट घेता आली नव्हती, मात्र शुक्रवारी राहुल गांधी यांनी हेलिकॉप्टरमधून अनेक छावण्या आणि शिबीरांना भेट देत पीडितांची भेट घेत, त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत काँगे्रसचे सरचिटणीस वेणुगोपाल देखील सोबत आहेत.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता हेलिकॉप्टरने मोइरांग येथे जाऊन तेथील बाधितांची भेट घेतली आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. राहुल गांधी यांच्यासोबत मणिपूरचे माजी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह, पक्षाचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल, पीसीसी अध्यक्ष कीशम मेघचंद्र सिंह आणि माजी खासदार अजय कुमारही उपस्थित होते. राहुल गांधी यांनी शुक्रवारी मणिपूरच्या राज्यपालांची भेट घेतली. राज्यातील परिस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात शांततेची आवश्यकता आहे. मी या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूने आलो आहे. राज्यात या घडीला शांततेची गरज आहे. हिंसेने काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. यावेळी गांधी यांनी येथील आश्रय आणि मदत शिबिरांना भेट दिली. शिबिरांमध्ये सुधारणांची गरज आहे. जेवण आणि औषधपाण्याची अबाळ आहे. सरकारला याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.  राहुल गांधी काल गुरुवारी मणिपूरमध्ये पोहोचले. चुराचांदपूर येथील मदत शिबिरांना भेटी देऊन तेथील नागरिकांची विचारपूस केली होती. हा भाग गेल्या दोन महिन्यांपासून अशांत आहे. हिंसाचारग्रस्त चुराचांदपूर परिसरातील मदत शिबिरांना भेट देण्यासाठी गेलेल्या राहुल यांना काल अर्ध्या रस्त्यातच अडवण्यात आले होते. स्थानिक पोलिसांनी त्यांचा ताफा रोखून धरला होता. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला होता.

COMMENTS