मध्य प्रदेश - महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली सध्या मध्य प्रदेशात आहे. महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून
मध्य प्रदेश – महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली सध्या मध्य प्रदेशात आहे. महाराष्ट्रातील प्रवास पूर्ण करून भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.
जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भाषणात राहुल गांधी आपला रोजचा दिनक्रम सांगत आहेत. यावेळी ते सांगतात की, मी सकाळी लवकर उठतो रोज भरपूर चालतो, पण मला थकवा येत नाही. यावेळी शेवटी ते ‘भाईयो और बहनो…’ म्हणत पंतप्रधान मोदी यांची नक्कल काढताना दिसले. राहुल गांधी नक्की काय म्हणाले येथे दिलेल्या व्हिडीओमध्ये पाहा.
COMMENTS