जालना प्रतिनिधी - राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी

जालना प्रतिनिधी – राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य करून ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी या मागणीसाठी आज जालन्यात भाजपच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. तसेच राहुल गांधी यांच्या पोस्टरवरील फोटोला जोडे मारून पायाखाली तुडवण्यात आले आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ओबीसी समाजाची माफी मागण्याची मागणी केली. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणा देखील देण्यात आल्या
COMMENTS