Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता : बिबटयाच्या हल्ल्याने चिमुकलीचा करून अंत

राहाता : राहाता तालुक्यातील धनगरवाडी, चितळी, वाकडी,परिसरात बिबटयाचे तीन ते चार वर्षापासून वास्तव्य असताना काही महिन्यापूर्वी चितळी शिवारात एका नर

बॅटरी वॅट क्षमतेमध्ये बदल केलेल्या ईव्ही बाईक्सवर कारवाई: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
बोरगावकरांच्या ’नदीष्ट’ला 5 लाखांचा भाषा सन्मान
महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून

राहाता : राहाता तालुक्यातील धनगरवाडी, चितळी, वाकडी,परिसरात बिबटयाचे तीन ते चार वर्षापासून वास्तव्य असताना काही महिन्यापूर्वी चितळी शिवारात एका नर भक्षी बिबट्याने भर दुपारी चिमुकलीचा बळी घेतला असताना त्याच ठिकाणहुन हवाई अंतरावर धनगरवाडी शिवारात पुन्हा एका चिमुकलीचा एका नर भक्षी बिबट्याने बळी घेतल्याने परिसरात घबराट, आक्रोश व वन विभागवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की राहाता तालुक्यातील धनगरवाडी दिघी शिवारात असलेल्या दत्त मंदिर येथे दि 26 मार्च रोजी रात्री नऊ च्या सुमारास जेवण करून हाथ धुण्यासाठी बाहेर गेलेल्या स्नेहल संतोष राशींनकर (वय 7) या चिमुकलीवर पाण्याच्या टाकी लगत दबा धरून बसलेल्या बिबटयने हल्ला करून मानेला जबड्यात धरून ओढत नेत असताना कुटुंबातील सदस्य व शेजारील लोकांनी आरडा ओरड करत धाव घेतली असता बिबट्याने सुमारे शंभर फूट अंतरावर चिमुकलीला जबड्यतुन सोडून दिले या जखमी चिमुकलीला तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिचा दुर्दैवी अंत झाला. 

COMMENTS