Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहाता महाविद्यालयात  स्नेहसंमेलन उत्साहात

राहाता : येथील शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार

डॉ. पुंडलिक राहात्याचे उपनगराध्यक्ष 
स्व.अजित पवारांना प्रभावती घोगरेंकडून अभिवादन
महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला : घोगरे

राहाता : येथील शिर्डी साई रूरल इन्स्टिट्यूटच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून युवा प्रबोधनकार व शिवचरित्रकार नितीन डांगे पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी ऍड. रघुनाथराव बोठे होते.

यावेळी नितीन डांगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान व आदर्शवत इतिहासाची उजळणी केली. ते म्हणाले, “शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तर तो आजच्या तरुणाईसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. जोपर्यंत युवक आतून पेटून उठत नाही, तोपर्यंत त्याचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. रघुनाथराव बोठे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, “महाविद्यालयीन जीवनात मिळणारे संस्कार आणि व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या भवितव्यास आकार देणारे असते. स्नेहसंमेलनासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.  स्नेहसंमेलन समितीचे प्रमुख डॉ. राजाराम वाकचौरे यांनी वार्षिक अहवाल वाचन करून वर्षभरातील शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचा आढावा घेतला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रोहिणी कासार व डॉ. सुरेश पुलाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. दिलीप नलगे यांनी मानले.

COMMENTS