Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांदवड तालुकाध्यक्षपदी रघुनाथ आहेर  

चांदवड प्रतिनिधी -  चांदवड तालुक्यातील गंगावे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर यांची चांदवड

लोकनेते विनायकराव मेटे यांचे प्रथम पुण्यस्मरण 14 ऑगस्ट रोजी
आंदोलन बंदी ही तर, मुस्कटदाबी
आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी

चांदवड प्रतिनिधी –  चांदवड तालुक्यातील गंगावे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तसेच समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर यांची चांदवड तालुकाध्यक्ष पदी वर्णी लागल्याने कार्यकर्त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. ऍड.रवींद्रनाना पगार नाशिक जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे हस्ते व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे उपस्थित तालुकाध्यक्ष म्हणून गंगावे येथील राष्ट्रवादी चे जेष्ठ कार्यकर्ते श्री रघुनाथ मोहन आहेर यांना तालुकाध्यक्ष म्हणून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले.

   आपण राज्याचे उप मुख्यमंत्री मा ना. अजितदादा पवार साहेब, मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ साहेब व प्रदेशाध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे साहेब यांचे विचार व पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी परिश्रम घ्याल असा विश्वास जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार यांनी व्यक्त केला.

COMMENTS