Homeताज्या बातम्यामनोरंजन

राघव चड्ढा- परिणीती चोप्राने साखरपुडा उरकला ?

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. जरी या जोडप्याने त

31 जोडपे आडकले विवाह बंधनात
सोनेरी दिव्यानं उजळलं सोलापूरच ‘प्रभाकर महाराज मंदिर’ 
गेवराईत पंडित-पवारांना पर्याय ; मस्के दाम्पत्यांची तालुक्यात घोडदौड

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. जरी या जोडप्याने त्यांच्यातील नाते अधिकृत जाहीर केले नसले तरी, पंजाबी गायक-अभिनेता हार्डी संधू सोबत आप खासदार संजीव अरोरा यांनीही ट्विट करून या जोडप्याचे अभिनंदन केले. लग्न आणि अफेअरच्या चर्चांवर परिणीतीने अद्यापही मौन बाळगले असले तरी, सध्या परिणीतीच्या एका अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले. सध्या तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत सोशल मीडियावर एका युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, परिणीतीच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. त्या व्हिडीओत तिच्या हातात अंगठी दिसत असून तिच्या हातातील अंगठी पाहून अनेकांनी एंगेजमेंट झाली का? असा प्रश्न विचारत आहे. सोमवारी रात्री सेलिब्रिटी मॅनेजर पूनम दमानिया यांच्या ऑफिसमध्ये परिणीती चोप्रा स्पॉट झाली. यावेळी तिने जिन्स आणि क्रॉप टॉप घातला होता. परिणीतीचा हा कॅज्युअल लूकमध्ये सर्वांचेच लक्ष स्वत: कडे वेधत आहे. ऑफिसमधून बाहेर पडण्यापूर्वी अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर स्माईलही दिली.

COMMENTS