Homeताज्या बातम्यादेश

गुजरात विद्यापीठात पुन्हा नमाज पठणावरून राडा

अहमदाबाद : गेल्या महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात खुल्या जागेत नमाज पठण केल्याने गोंधळ उडाला होता. या वरुण बाहेरून आलेल

राज्यस्तरीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी  गौतम पब्लिक स्कूलचा संघ रवाना
अध्यादेशाचा उतारा
राहुल गांधी यांची सोमवारी ईडी चौकशी | LokNews24

अहमदाबाद : गेल्या महिन्यातच काही परदेशी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या आवारात खुल्या जागेत नमाज पठण केल्याने गोंधळ उडाला होता. या वरुण बाहेरून आलेल्या 20-25 जणांनी विद्यार्थ्यांना मारहाण करून विद्यापीठात तोडफोड केली होती. ही घटना ताजी असतांना, काल रात्री पुन्हा विद्यापीठाच्या वसतिगृहात नमाज पठण करण्यावरून राडा झाला आहे. उघड्यावर नमाज पठण केल्यावर परदेशी विद्यार्थ्यांशी झालेल्या भांडणानंतर 7 अफगाण विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. या बाबत माहिती देताना अधिकार्‍यांनी सांगितले की, यातील 5 विद्यार्थ्यांनी यापूर्वीच वसतिगृह सोडले आहे.

COMMENTS