पुणे ः पुण्यातील कुरकुंभमधील मेफेड्रोनचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदिप धुनिया आणि हैदर यांच्या सातत्याने संपर्
पुणे ः पुण्यातील कुरकुंभमधील मेफेड्रोनचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी संदिप धुनिया आणि हैदर यांच्या सातत्याने संपर्कात असलेल्या मोहंमद ऊर्फ पप्पू कुतुब कुरेशी (47, रा. विश्रांतवाडी, पुणे) याला गुन्हे शाखेने कर्नाटकातून बेड्या ठोकल्या आहेत. त्याला न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणात आतापर्यंत वैभव माने, अजय करोसिया, हैदर शेख, भीमाजी साबळे, युवराज भुजबळ, आयुब मकानदार, संदीपकुमार, दिवेश भुथानी, संदीप यादव, सुनीलचंद्र बर्मन यांना अटक केली होती. आतापर्यंत या प्रकरणात 1 हजार 836 किलो मेफेड्रोन पकडण्यात आले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 3 हजार 674 कोटी 35 लाख 30 हजार आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप धुनिया याच्यासह 5 जणांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये आरोपींच्या टोळीने मुख्यत्वे हैदर शेख याने पप्पू कुरेशीला पुणे, महाराष्ट्रात तसेच दिल्लीत मेफेड्रोन तस्करी करण्यासाठी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पप्पू कुरेशी हा सातत्याने संदीप धुणे ऊर्फ धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात होता.
COMMENTS