श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समाजाचे कल्याणकारी स्वप्न पाहिले.कर्मवीरांचा हाच आदर
श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समाजाचे कल्याणकारी स्वप्न पाहिले.कर्मवीरांचा हाच आदर्श जपणारे पालक आणि विद्यार्थी भूषणावह आहेत. गुणवत्ता आणि संस्कार हीच खरी शिक्षणाची ओळख आहे, ती सदैव रुजली पाहिजे असे विचार स्नेहपरिवार ग्रुपचे अध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील मार्केट यार्ड परिसरातील शिवाजीनगर भागातील प्रा. अण्णासाहेब गोराणे आणि सौ. भारती गोराणे यांच्या सिध्देश मुलाने10 वी परीक्षेत97 टक्के गुण व गणित, विज्ञान विषयात100 पैकी100 गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी प्राचार्य शेळके बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी गोराणे परिवार आणि पाहुणे यांच्या शैक्षणिक योगदानाची माहिती देऊन स्वागत केले. सिद्धेश अण्णासाहेब गोराणे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातून 10 वी परीक्षेत 97 टक्के गुण मिळविले आणि आता तो आय.आय.टी. शिक्षणकोर्ससाठी पुणे येथे प्रवास करणार आहे त्याबद्दल त्याचा सत्कार आणि शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी अनेक मान्यवरांनी गोराणे सिद्धेश याचा सत्कार करून मनोगत व्यक्त केले. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे यांनी प्रमाणपत्र, शाल, बुके, पुस्तके, भेटवस्तू देऊन सत्कार केला तसेच प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ, प्रा. रामचंद्र राऊत, डॉ. बाबुराव उपाध्ये यांनीही सिध्देश गोराणे आणि परिवाराचा सन्मान केला. प्राचार्य शेळके यांनी प्रा. अण्णासाहेब गोराणे यांचे महाविद्यालयातील शैक्षणिक कार्य जसे गुणवत्ताशील आहे तसेच घरातील, मुले-मुली यांनाही त्यांनी उत्तम शिक्षण व संस्कार दिले आहेत, हाच आदर्श जपण्यासारखा आहे. यावेळी प्रा. अण्णासाहेब गोराणे, सिध्देश गोराणे यांनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. डॉ. उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.भारती गोराणे यांनी आभार मानले.
COMMENTS