Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गावांच्या शाश्वत विकासासाठी QCI आणि नाशिक जिल्हा परिषदेने दिले दोनशेहून अधिक सरपंचांना प्रशिक्षण

नाशिक:  ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासातील उद्दीष्टांचे स्थानिकीकरण या विषयावर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचा सरपंच संवाद हा उपक्रम, क्वालिटी सिटी

द्रौपदी मुर्मू देशाच्या कणखर राष्ट्रपती ठरतील !
तणावमुक्त जीवन जगत नियमित व्यायाम केल्यास ह्र्दय विकाराचा धोका टळू शकतो:- डॉ.जगदीश हिरेमठ
पी.यु.सी. प्रमाणपत्रांचे सुधारीत दर जाहिर

नाशिक:  ग्रामपंचायतींमध्ये शाश्वत विकासातील उद्दीष्टांचे स्थानिकीकरण या विषयावर क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचा सरपंच संवाद हा उपक्रम, क्वालिटी सिटी नाशिक अभियान आणि  नाशिक जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ मार्च रोजी आयोजित क्षमता निर्माण कार्यशाळेमध्ये नाशिकमधील दोनशेहून अधिक सरपंचांनी सहभाग घेतला. गावपातळीवर या विकास उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये याबाबतीतसरपंचांना सुसज्ज करणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आदिवासी कार्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रमांसह) श्री. दादाजी भुसे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री श्री. छगन भुजबळ यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रास ऑनलाईन हजेरी लावली. तसेच नाशिकचे विभागीय आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी; श्रीमती आशिमा मित्तल, नाशिक महानगरपालिका आयुक्त; डॉ. अशोक करंजकर, पोलीस आयुक्त; श्री. संदीप कर्णिक; NABET, सीईओ डॉ. प्रो. वरिंदर कंवर, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीयाचे; श्री हिमांशू पटेल, नियामक मंडळ सदस्य, QCI; माजी सरपंच, पुंसरी, गुजरात; कार्यकारी मंडळ सदस्य श्री. जीतूभाई ठक्कर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी क्रेडाई नाशिक सिटीचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी आभार मानले. या उपक्रमात सहभागी करुन घेतल्‍याबद्दल त्‍यांनी आयोजकांप्रति आभार व्‍यक्‍त केले. 

कार्यशाळेस उपस्थित सरपंचांना संबोधित करताना डॉ. भारती प्रवीण पवार म्हणाल्या, की, “पंचायत राज संस्‍थांचे सबलीकरण करुन ग्रामीण भारताकडे लक्ष केंद्रित करतांना विकसीत भारत @२०४७ ची मोहिम यशस्‍वी करण्याच्‍या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. क्‍वालिटी कौन्‍सिल ऑफ इंडियासमवेत मिशन क्‍वालिटी सिटी नाशिक आणि सरपंच संवाद यांचे संयुक्‍त प्रयत्‍न कौतुकास्‍पद आहेत. या उपक्रमाच्‍या माध्यमातून सरपंचांचे ज्ञानवर्धन होण्यासोबत शाश्‍वत विकासाचे धेय्य गाठण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्‍ये सरपंचांना आत्‍मसात करण्याची संधी उपलब्‍ध झाली आहे. सातत्‍यपूर्ण प्रशिक्षण आणि क्षमता विकासाच्‍या माध्यमातून आम्‍ही त्‍यांना सक्षम बनवत आहोत. खेड्यांच्‍या विकासासाठी उपलब्‍ध असलेल्‍या प्रभावी शासकीय योजनांची माहिती त्‍यांना देतांनाच त्‍यासोबत व्‍यवहारात पारदर्शकतेच्‍या अनुषंगाने मार्गदर्शन केले जाते आहे. आपण महिलांच्‍या बचत गटांच्‍या समुहाला सक्षम करण्याची आवश्‍यकता असून, त्‍यांच्‍यामध्ये उद्योजकता, व्‍यवसायिकेचे मुल्‍य रुजविण्याची गरज आहे. वेळ अत्‍यंत महत्त्वाचा असून, आपण ग्राम पंचायत विकास योजना व स्‍थानिक शाश्‍वत विकासाचे धेय्य गाठण्यासाठी निर्धारित केलेल्‍या मुदतीत हे काम पूर्ण करुया.”

या प्रसंगी, श्री छगन भुजबळ यांनी प्रतिपादन केले की, “ग्रामिण नेतृत्वाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात शाश्वत विकासाची आस निर्माण करणारा हा उपक्रम ग्रामीण बांधवांप्रती असलेली आपली बांधिलकी दर्शवतो. ग्रामीण भागातील गरिबी, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या गंभीर समस्यांवर उपाययोजना गुणवत्तापूर्ण भारत आणि विकसीत भारत घडविण्याच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करण्याचे काम क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया या निमित्ताने करत आहे. कार्यशाळेत सहभागी सरपंचांच्या समर्पणाचे मी कौतुक करतो आणि त्यांना त्यांच्या समाजातील बदलाचे चॅम्पीयन बनण्याचे आवाहन करतो.”

“सरपंच हे त्यांच्या ज्ञानाचे कृतीत रूपांतर करून सकारात्मक बदल घडवणारे असतात. त्यामुळे, जनसहभागाला आणि जबाबादारीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच विकसित भारत यात्रेचा महत्त्वपूर्ण भाग होण्यासाठी अशी प्रशिक्षण सत्रे वेळोवेळी आयोजित करणे अत्यावश्यक आहे”,  असे श्री दादाजी भुसे म्हणाले. 

QCI चे अध्यक्ष श्री. जक्षय शाह यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, , “या प्रशिक्षण सत्रात सरपंचांचा उत्स्फूर्त सहभाग आनंदीत करणारा आहे. दर्जेदार शहरी विकासाची ‘गंगोत्री’ म्हणून नाशिक उदयास येते आहे आणि ही बाब देशभरातील इतर शहरांसाठी एक प्रेरक उदाहरण आहे. क्वालिटी सिटी अभियानाचा स्वीकार करून आणि सरपंच संवाद उपक्रमात परस्पर सहकार्य करून, आपण निश्चितच ग्रामिण आणि शहरी समुदाय एकत्रितपणे विकसीत होतील असे भविष्य घडवण्याच्या दिशेने कार्य करू शकतो या परिवर्तनाच्या प्रवासात इतर शहरांनीही सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो.”

या कार्यक्रमात बोलताना श्रीमती आशिमा मित्तल म्हणाल्या, “गरीबी-मुक्त आणि कौशल्य विकासातून जीवनमान उंचावणे, बाल-स्नेही गाव (शिक्षण), आणि स्वच्छ आणि हरित गाव (स्वच्छता) या शाश्वत विकासाच्या स्थानिकीकरणातील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांची सर्वसमावेशक माहिती या कार्यशाळेने दिली.  उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षमतेने वापर करण्याची कौशल्ये शिकवून कार्यशाळेने संबंधित स्थानिक समस्यांवर शाश्वत उपाय अंमलात आणण्यासाठी सरपंचांना सुसज्ज केले.”

मिशन क्वालिटी सिटी नाशिकचा प्रभाव अधोरेखित करताना, डॉ. (प्रा.) वरिंदर कंवर म्हणाले, “या उपक्रमात ४८ संघटना, स्वयंसेवी संस्था, दीड लाख नागरिकांचा स्वच्छतेच्या शपथेमध्ये सहभाग आणि ५ हजार शाळकरी मुलांनी पोस्टकार्डातून केलेला स्वच्छता संकल्प, १५ हजारांहून अधिक व्यक्तींना विविध कामांच्या कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि ६०० अंगणवाडी सेविकांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण मिळाले. या अभियानात क्वालिटी वार्ड ही चळवळ देखील प्रवर्तित केली, ज्यात नागरिकांना त्यांचा वार्ड सुधारण्यात सामील करून घेतले. या कार्यक्रमात नागरिक जागृती मोहीम आणि झोपडपट्टी सुधार उपक्रमांसह विविध उपाययोजनांद्वारे कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात आले. शिवाय, या उपक्रमाने जिल्ह्यातील 36 शाळांच्या विकासासाठी NABET (QCI बोर्ड) सोबत सामंजस्य करार केले आहेत. ग्रामीण गुणवत्ता चळवळीचा भाग होण्यासाठी स्‍कॅन करा सर्व सरपंच हे ‘सरपंच संवाद ॲप’  येथून डाउनलोड करु शकतात.

COMMENTS