Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुसाणे गाव होणार भारनियमनमुक्त

पुणेः जिल्ह्यातील मावळ येथे असलेले पुसाणे हे गाव भारनियमनमुक्त मुक्त होणार आहे. पुसाणे गावात 24 तास सोलर सिस्टीमद्वारे गावाला वीज मिळणार असल्याने

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई  ; १६२ दुचाकी वाहने जप्त 
एअर इंडियाच्या महिला क्रू मेंबरशी गैरवर्तन
मोदींच्या या योजनेमुळे तरुणांनी थेट रेल्वेचं पेटवली | LOK News 24

पुणेः जिल्ह्यातील मावळ येथे असलेले पुसाणे हे गाव भारनियमनमुक्त मुक्त होणार आहे. पुसाणे गावात 24 तास सोलर सिस्टीमद्वारे गावाला वीज मिळणार असल्याने गावकरी आनंदी आहेत. गावाची लोकसंख्या दीड हजार आहे. गावात तासनतास वीज नसायची. यामुळे गावातील महिलांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी वणवण फिरावे लागायचे. मात्र, आता सोलर सिस्टीमद्वारे वीज मिळणार असल्याने शाळा, मंदिर, पाणी उपसाकेंद्र, पथदिवे हे सुरू राहणार आहेत.
ग्रामीण भागात आजही तासनतास वीज नसते. याचा थेट फटका नागरिकांना आणि महिलांना बसतो. विजेविना पाण्याचा खोळंबा होतो, महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. परंतु, पुसाणे येथील हाच प्रश्‍न आता कायमचा मार्गी लागणार आहे. पुसाणे गावचे सरपंच संजय आवंडे आणि जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या पुढाकाराने सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात काम पूर्ण होईल, अशी माहिती गावचे सरपंच संजय आवंडे यांनी दिली आहे. परदेशातील एका खासगी कंपनीने कोट्यवधी रुपये खर्च करत सोलर प्रकल्प उभारला आहे. बॅटरी आणि जनरेटर बॅकअप असलेला हा प्रकल्प देशातील पहिला प्रकल्प असल्याचा दावा करण्यात येत आहे. पुसाणे गावात गेली 35 वर्षे बिनविरोध सरपंचाची निवड होत असून, गाव राजकारण विरहित असल्याने विकास होत आहे, अशी माहिती किशोर आवारे यांनी दिली.

COMMENTS