Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नृत्यकला अकॅडमीची विद्यार्थिनी पौर्णिमा अंबरगे ठरली मिस फलटण

फलटण : मिस फलटणचा किताब देताना सुभद्राराजे नाईक निंबाळकर व उपस्थित मान्यवर. फलटण / प्रतिनिधी : लायन्स क्लब फलटण गोल्डन आणि व्हीएनएस ग्रुपतर्फे महि

महाबळेश्‍वर तहसिल कार्यालयाच्या परिसरात पांढर्‍या शेकरूचे दर्शन
कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
धुळोबा डोंगरावर ट्रेकिंग करताना व्यावसायिक सुहास पाटील यांचा मृत्यू

फलटण / प्रतिनिधी : लायन्स क्लब फलटण गोल्डन आणि व्हीएनएस ग्रुपतर्फे महिला दिनानिमित्त मिस फलटण 2022-23 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर आणि सौ. मृणाली भोसले यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात नृत्यकला अ‍ॅकॅडमीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नृत्यकला अ‍ॅकॅडमीची पौर्णिमा अंबरगे या विद्यार्थीनीने नृत्यकला अकॅडमीच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
पहिल्याच वर्षी पहिल्या प्रयत्नात पोर्णिमा अंबरगे हिणे 2022-23 मिस फलटण हा किताब मिळवला आहे. नृत्यकला अकॅडमीचे छोट्या मुलां-मुलींपासून ते वयोवृध्द महिलांपर्यंत वयोगटानुसार डान्स क्लास सुरू आहेत. लायन्स क्लब फलटण, गोल्डन महिला सभासद सौ. सुनीता कदम, सौ. उज्ज्वला निंबाळकर, सौ. सविता कापडी, सौ. सोनाली गुंजवटे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नीलम देशमुख आणि दिपाली निंबाळकर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनाची सौ. संध्या गायकवाड यांनी मानले.

COMMENTS