Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मवेशीमध्ये पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण

अकोले : सामाजिक कार्यकर्ते राहुल राऊत यांचे बंधू स्व. सचिन राऊत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 100 झाडे लावण्याचा संकल्प राऊत यांनी पूर्ण केला. त्यांन

शेतकऱ्यांनी केली होती गांज्याची शेती… पोलिसांनी टाकली धाड…
दहावीच्या  निरोप समारंभात कवितांचा बहर
प्रा.डॉ. शेळके यांना ‘अवार्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार 

अकोले : सामाजिक कार्यकर्ते राहुल राऊत यांचे बंधू स्व. सचिन राऊत यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 100 झाडे लावण्याचा संकल्प राऊत यांनी पूर्ण केला. त्यांनी जि.प.प्राथमिक शाळा पुरुषवाडी, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, एकलव्य स्कूल मवेशी, तसेच सचिन राऊत यांचे मित्र योगेश भांगरे यांच्या शेतात वृक्षारोपण करून एक आगळावेगळा आदर्श समाजासमोर ठेवला.

या कार्यक्रमासाठी मवेशी गावचे प्रथम नागरिक यमाजी भांगरे, तसेच मवेशी परिसरातील दौलत कांबळे, पांडुरंग भांगरे, घोडे महाराज, दत्ता लांगी, रमेश लेंभे, एकलव्य मॉडेल रेसिडेन्सिअल स्कूलचे प्राचार्य देवानंद थूल, आदर्श स्कूलच्या कुलप्रमुख नागरगोजे, भरत बांबळे, गोविंद बांगर, महेश सहाणे, नवनाथ इंगळे तसेच सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

COMMENTS