Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा रेल्वे प्रश्‍नांवर खासदार वाकचौरे यांची घेणार भेट ः कुलकर्णी

पुणतांबा ः पुणतांबा गावातील रेल्वे प्रश्‍न बाबत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यां

माहिती जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
शिर्डीत मुलांनी तिरंग्यासह साकारला 75
जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला

पुणतांबा ः पुणतांबा गावातील रेल्वे प्रश्‍न बाबत खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेनेचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला खासदार वाकचौरे विजयी झाल्यामुळे खर्‍या अर्थाने आपला माणूस आपल्यासाठी काम करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षापासून रेल्वेचा प्रश्‍न प्रलंबित असून पुणतांबा जंक्शन रेल्वे स्थानक असले तरी एकच रेल्वे गाडी रेल्वे स्थानकावर थांबते त्यामुळे जंक्शनच्या दर्जा नुसता नवापुरता दिला काय असा प्रश्‍न उपस्थित झालाय गेल्या दहा वर्षे खासदार म्हणून सदाशिव लोखंडे यांनी काम पाहिले पुणतांबाच्या रेल्वे समस्या कडे दुर्लक्ष केले. गेल्या दहा वर्षात एकदाही पुणतांब्याला भेट दिली नाही. त्यामुळे मतदारांनी लोखंडे यांना पराभूत केले. पुणतांबा रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस काकीनाडा पुणे मुंबई जलद पॅसेंजर व कोरोना काळात बंद पडलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी शिर्डीचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ग्रामस्थांची शिष्टमंडळ रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. पुणतांबा रेल्वे स्थानक नुसते नावापुरते राहिले आहे. शिर्डीहून येणार्‍या जलद गाड्या पुणे मार्गे जाणार्‍या नवीन होत असलेल्या. कवाड लाईन मुळे पुणतांबा रेल्वे स्थानकावरून येता नवीन मार्गाने जाणार आहे त्यामुळे प्रवासी व व्यावसायिक वर्गाचे अतोनात नुकसान होणार आहे पर्यायाने व्यावसायिक बेरोजगार होणार आहे. तरी जलद गाड्यांना थांबा मिळण्यासाठी खासदार भाऊसाहेब वाकचौरे प्रश्‍न मार्गी लावणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. रेल्वे प्रश्‍नाबरोबर गावातील पर्याय उद्योगाचा प्रश्‍न तसेच विविध रस्ते यांची कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्यास सांगितले.

COMMENTS