Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू तस्करांना विविध कलमान्वये शिक्षा 

अहमदनगर :जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.५ एस. व्हि.सहारे मॅडम यांनी जगन्नाथ रघुनाथ बर्डे, (रा.हनुमान वाडी पिंपरी वळण, ता.राहुरी), किशोर कानिफनाथ वार

जुनी पेन्शन व अनुदानवाढीसाठी आंदोलन ; मुंबईतील शिक्षक आंदोलनास नगरचा पाठिंबा
परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे
संत सावता माळी कोपरगाव तालुका संघटकपदी माळवदे

अहमदनगर :जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र.५ एस. व्हि.सहारे मॅडम यांनी जगन्नाथ रघुनाथ बर्डे, (रा.हनुमान वाडी पिंपरी वळण, ता.राहुरी), किशोर कानिफनाथ वारुळे,(रा.वारुळवाडी, ता.नगर) सुधिर मुरलीधर दुसुंगे, (रा.कापुरवाडी, ता.नगर) सोनल सुभाष निकम,(रा.वडगाव गुप्ता,अ.नगर) युसुफ नजीर पठाण,(रा.तवलेनगर, अ.नगर) प्रमोद बाळासाहेब कराळे, ( रा.वसंत टेकडी, पाईपलाईन रोड, अ.नगर) यांना चोरीच्या गुन्ह्यात दोषी धरून प्रत्येकी २ वर्षे शिक्षा, प्रत्येकी ३ हजार रूपये दंडाची शिक्षा सदर दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, ठोठावली आहे

आरोपी जगन्नाथ बर्डे, किशोर कानिफनाथ वारुळे, सुधिर दुसुंगे, सोनल निकम, युसुफ पठाण,प्रमोद कराळे यांना भां.द.वी.कलम १४३ मध्ये प्रत्येकी 6 महिने शिक्षा, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा, जगन्नाथ बर्डे, किशोर वारुळे, सुधिर दुसुंगे, सोनल निकम, युसुफ पठाण, प्रमोद कराळे यांना भा.द.वी.कलम १४७ मध्ये ६ महिने प्रत्येकी शिक्षा, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा, जगन्नाथ बर्डे, किशोर वारुळे, सुधिर दुसुंगे, सोनल निकम, युसुफ पठाण, प्रमोद  कराळे यांना भां.द.वि कलम ३५३ मध्ये २ महिने प्रत्येकी शिक्षा, प्रत्येकी ३ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिना शिक्षा, जगन्नाथ बर्डे, यांना भा.द.वी.कलम ४२७ मध्ये ६ महिने प्रत्येकी शिक्षा, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा, जगन्नाथ बर्डे, यांना भा. द. वि. कलम ३२३ मध्ये १ वर्षे शिक्षा, १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा, किशोर वारुळे, सुधिर दुसुंगे, सोनल निकम, युसुफ पठाण,प्रमोद कराळे यांना भां.द.वि. कलम ५०६, मध्ये ६ महिने प्रत्येकी

शिक्षा, प्रत्येकी १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस शिक्षा, सर्व शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत असा आदेश केला आहे. या घटनेची थोडक्यात हकिकत अशी कि, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक वांबोरी.कडुन राहुरी कडे जात असताना त्यावेळी राहुरी कडुन वांबोरी कडे यातील आरोपी जगन्नाथ बर्डे हा त्याचे ताब्यातील ढंम्पर (नंबर एम एच १६ ए जी ९८८३) मध्ये ४ ब्रास चोरीची वाळु घेवुन भरधाव वेगाने जात असताना पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला असता त्याने पोलिसांना जीवे मारण्याचे उददेशाने ढंम्पर भरधाव वेगाने चालवुन पोलिस

बसलेल्या जीपवर घालुन त्यांना जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला व अन्य आरोपींनी  स्वीप्ट व बोलेरो गाडी मधुन पाठीमागुन येवुन गैरकायद्याची मंडळी जमा करुन पोलिस पथकाला दमदाटी करुन त्यांच्याबरोबर झटापट करुन सरकारी काम करत असताना त्यांचे सरकारी कामात अडथळा निर्माण करून सरकारी वाहनाचे नुकसान केले.या प्रकरणी राहुरी पोलिसानी तपास करुन आरोपीवर दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरुन सदर आरोपींना दोषी धरण्यात आले सर्व आरोपींना खुनाचा प्रयत्ना च्या गुन्ह्यातून निदोर्ष मुक्तता करण्यात आली. आरोपींना एकुण ४३ हजाराचा दंड करण्यात आला. सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षाच्या वतीने ॲड. मंगेश व्ही. दिवाणे यांनी पाहीले त्यांना पैरवी अधिकारी जमादार.विलास साठे व पोलिस कॉन्स्टेबल योगेश वाघ यांनी सहकार्य केले.

COMMENTS