महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

Homeमहाराष्ट्रशहरं

महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : महिलेची छेड काढणारा गणेश उर्फ अर्जुन शिवाजी वाघुले (वय 28, रा. रतडगाव, ता. नगर) यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्ष

पारनेरच्या भाळवणीत सापडला जिवंत बॉम्ब !
अ‍ॅड. पल्लवी कांबळेचा नॅशनल फिनिक्स गोल्ड स्टार अवॉर्डने सन्मान
अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : महिलेची छेड काढणारा गणेश उर्फ अर्जुन शिवाजी वाघुले (वय 28, रा. रतडगाव, ता. नगर) यास अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यु. पी. देवर्षी यांनी एक वर्ष सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने दि. 25 नोव्हेंबर 2011 रोजी पहाटे अंगणात झाडलोट करणार्‍या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार एस.डी. भोस यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकारी वकील अ‍ॅड अर्चना चव्हाण-थोरात यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कॉन्स्टेबल मंजुश्री तांदळे, पोलिस हवालदार एन. एल. चव्हाण यांनी साहाय्य केले. सरकारी वकील अ‍ॅड. चव्हाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन तसेच सादर केलेले साक्षी पुरावे पाहून न्यायालयाने आरोपीस सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

COMMENTS