Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा

कोपरगाव शहर ः कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दि

शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच
मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका

कोपरगाव शहर ः कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 5 लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी. नं. 171/2021 दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अक्षय राजेंद्र मोर्डेकर यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगांव येथील न्यायाधिश  भगवान धों. पंडित यांनी आरोपीस 6 महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस 6 लाख 50 हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा 6 महिन्याची सख्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अ‍ॅडव्होकेट  एस्.डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS