Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील वाहतूक कोंडीचा फटका पोलिस अधिकार्‍यांनाच

दोन किलोमीटरसाठी लागला तब्बल दोन तासांचा वेळ

पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरातील वाहतूक कोंडीत अडकणार्‍या पुणेकरांच्या हाल पहावत नसतानाच दस्तर खुद काही पोलीस अधिकारी देखील या वाहतूक कोंडीत अडकले अ

बिग बॉसच्या घरात पडणार पैशांचा पाऊस
राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका
कराड तालुक्यात वादळी वार्‍यामुळे नुकसान

पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरातील वाहतूक कोंडीत अडकणार्‍या पुणेकरांच्या हाल पहावत नसतानाच दस्तर खुद काही पोलीस अधिकारी देखील या वाहतूक कोंडीत अडकले अन् जिवाचा त्रागा-त्रागा झाला. केवळ दोन किलोमीटरसाठी पोलिस अधिकार्‍यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला. अभिमानश्री सोसायटी ते पुणे विद्यापीठ रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मेट्रोच्या कामामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कॉसमॉस जंक्शन ठिकाणी मेट्रोचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. यामुळे येथे मेट्रो विभागाने रात्रीत बॅरिकेट्स टाकण्यात आले होते. त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती.

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मंगळवारीच पोलिस आयुक्तलयात बैठक पार पडली. बैठकीत पोलिस आयुक्त, महापालिका, मेट्रो तसेच आरटीओ व इतर अधिकारी उपस्थित होते. गर्दी होणार्‍या 15 रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पहिल्या टप्यात प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तत्पूर्वी शहरातील वाहतूक कोंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागलेले आहेत. काही केल्या वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होत नसल्याचे वास्तव आहे. दरम्यान, प्रत्येक भागात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस मात्र वाहने उचलण्याकडे अन् पुणेकरांवर दंड ठोकण्यात मग्न आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक पोलिसांच्या अंदाधुद कारभाराने चांगलाच धुमाकूळ घातलेला आहे. तो अद्यापही सुरूच असल्याचे दिसत आहे. काही भागात हे पोलीस दिसत असले तरी त्यातून वाहतूक कोंडी सुटलेली नाही. दरम्यान, या वाहतूक कोंडीचा प्रत्यय आज पुणे पोलीस दलातील काही पोलीस अधिकार्‍यांनी देखील घेतला. बुधवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तालय व पोलीस ठाण्यात जाण्यासाठी काही अधिकारी औंध परिसरातून पुणे विद्यापीठ येथून येत होते. मात्र, यादरम्यान अभिमान श्री सोसायटी ते पुणे विद्यापीठ अशी वाहनांची रांगच रांग लागलेली होती. हे अधिकारी देखील त्यात अडकले. जवळपास पुणे विद्यापीठपर्यंत यायला दीड तासांचा वेळ लागला. त्यामुळे त्यांनीही डोक्यावर हात मारून घेतला. या वाहतूक कोंडीत त्यांना कुठेच वाहतूक पोलीस दिसले नाही. ते पुणे विद्यापीठ चौकातच उभा होते.

COMMENTS