Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील युवकाचा शिरवळमध्ये गोळ्या झाडून खून; अवघ्या 24 तासांत पोलिसांकडून पर्दाफाश

खंडाळा / प्रतिनिधी : शिरवळमध्ये काल (रविवार) रात्री उशिरा आठ वाजण्याच्या सुमारास शिरवळ (फुलमळा) येथील सहामजली असणार्‍या लेक पॅलेस अपार्टमेंटच्या टेरे

वनव्यापासून वनसंपदेच्या बचावासाठी अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करा : ना. गणेश नाईक
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री
विकास कामांमुळे कॉलर उडविणार्‍यांचा लोकसभेला पराभव : सारंग पाटील

खंडाळा / प्रतिनिधी : शिरवळमध्ये काल (रविवार) रात्री उशिरा आठ वाजण्याच्या सुमारास शिरवळ (फुलमळा) येथील सहामजली असणार्‍या लेक पॅलेस अपार्टमेंटच्या टेरेसवर डोक्यात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली होती. मृत युवकाचे नाव संजय सुभाष पाटोळे (वय 36, रा. बिबवेवाडी, पुणे) असे असल्याचे समजते. दरम्यान, रात्री घडलेल्या या खुनाचा तपास अवघ्या 24 तासात शिरवळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने लावला. या प्रकरणी तरबेज सुतार या संशयितास अटक करण्यात आलीय.
लेक पॅलेस अपार्टमेंटच्या टेरिसवर काल एक महिला गेली असता, रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ती पडल्याचे दिसून आल्यानंतर हा प्रकार उघडीस आला. त्यानंतर शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराची कसून तपासणी केली होती. ही व्यक्ती पुण्यातील असल्याचे तपासाअंती समजले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीचा शोध घेऊन हत्या करणार्‍या संशयिताला अटक केली. दरम्यान, मृताच्या खिशात सापडलेल्या एका हॉटेलाच्या बिलावरुन याचा तपास लागल्याची प्राथमिक माहिती सातारा जिल्हा पोलीस दलातून देण्यात आली.

COMMENTS