Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 21 नोव्हेंबरपासून

विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रावर भरारी पथके

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथके आणि पोलिसांची म

पुणे विद्यापीठाच्या बनावट पदवी प्रमाणपत्राद्वारे मिळवली नोकरी
पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्येविद्यार्थ्यांनी घातला गोंधळ
पुणे विद्यापीठात अभाविपचा जोरदार राडा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षेसाठी भरारी पथके आणि पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. हिवाळी सत्राच्या परीक्षांसाठी परीक्षा केंद्रावर विद्यापीठाकडून बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षकांची नेमणूक केली जात आहे.
बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक, भरारी पथक सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी सर्व संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्थाकडून त्यांच्या महाविद्याल्यातील काही शिक्षकांची नावे मागविण्यात आलेली आहेत. मात्र, विद्यापीठाने नियुक्त केलेले बरेच बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक त्यांना नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर हजर होत नाहीत असे निदर्शनास आले आहे. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठ, संलग्न, संचलित महाविद्यालये, समूह महाविद्यालये किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी परीक्षेसंदर्भात त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडणे अपेक्षित आणि आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून विद्यापीठाकडून वहिःस्थ पर्यवेक्षक, दक्षता पथक सदस्य म्हणून नेमणूक केलेल्या शिक्षकांना संबंधित जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यमुक्त करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या बाबत कसूर झाल्यास अध्यापक मान्यतेला स्थगिती, दंड अशा स्वरुपाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिक्षक यांनाही सुरक्षा व्यवस्थेबाबत पत्र देण्यात आले आहे. विद्यापीठाची परीक्षा 100 परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असण्याच्या कालावधीत शहर आणि जिल्ह्यातील संबंधित परीक्षा केंद्र, परीक्षा केंद्रांचे केंद्रप्रमुख, प्राचार्य, वरिष्ठ पर्यवेक्षक यांना गरजेनुसार पोलीस सहकार्य कृपया उपलब्ध करून द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS