पुणे / प्रतिनिधी : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाचे सर्वोत्कृ
पुणे / प्रतिनिधी : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने ‘सवाल अंधाराचा’ या नाटकाचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांकाचा करंडक पटकाविला. तसेच कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ या नाटकाला द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
पद्मावती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागातील दोन दिवसीय आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेचा मंगळवार, दि. 8 रोजी समारोप झाला. यावेळी थाटात झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांची मुख्य पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य अभियंते सचिन तालेवार, सुनील पावडे, परेश भागवत यांची उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्या संघांना करंडक तसेच वैयक्तिक गटातील विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
नाट्य स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मंगळवारी पुणे परिमंडलाने मुख्य अभियंता सचिन तालेवार निर्मित व अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार दिग्दर्शित ‘सवाल अंधाराचा’ ही नाट्यकृती सादर केली. प्र. ल. मयेकर लिखित या नाटकाच्या प्रभावी सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या नाटकासह कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ व बारामती परिमंडलाचे ‘ब्लाईंड गेम’ या नाटकांच्या सादरीकरणाचे परीक्षण नाट्य परीक्षक संजय गोसावी, अरुण पटवर्धन व सौ. मंजुषा जोशी यांनी केले. यामध्ये पुणे परिमंडलांचे ‘सवाल अंधाराचा’ नाटकाने प्रथम तर कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला.
COMMENTS