Homeताज्या बातम्यासंपादकीय

पुण्याचा लौकिक आणि आजची स्थिती

शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांची कर्मभूमी म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे शहर, राजकी

भाजपने फुंकले रणशिंग
काँगे्रस-ठाकरेंतील कुरघोडीचे राजकारण
ट्रम्प यांच्या हत्येमागचे षडयंत्र

शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांची कर्मभूमी म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे शहर, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्र असतांना या शहरातचा लौकिक धुळीस मिळतांना दिसून येत आहे. खरंतर या शहरामध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा लोंढा देखील याठिकाणी येतो. मात्र या शहरात ड्रग्जच्या आहारी जाणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून करिअर, शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी देखील कळत-नकळत या ड्रग्जच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युवा पिढी बरबाद करण्याचे धडे या शहरातून विद्यार्थी गिरवू शकतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचवण्याची गरज असतांना, आपण त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे. पुणे शहरातचा नावलौकिक धुळीस मिळवण्यामागचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपासून पुण्यात प्रचंड गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे अमलीपदार्थांच्या पार्टया, महाविद्यालयीन तरूण या नशेच्या गर्तेत अडकत चालल्याचे दिसून येत आहे. पुण्याचा लौकीक धुळीस मिळत असतांना, सरकार आणि प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. पुण्याचे आयुक्त अमितेशकुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ते त्यांची छाप सोडतील असे वाटले होते.

त्यादृष्टीने त्यांनी सर्व गुंडांची परेड केल्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे पुण्यातील गुंडांची दहशत संपेल असे वाटत असतांना, पुण्यात हिट अ‍ॅण्ड रनचे प्रकरण घडले, आणि पुन्हा एकदा पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळली.  पुण्यात काही महिन्यांपूर्वी कोयता गँगने प्रचंड धुमाकूळ घातला होता, तो धुमाकूळ कमी होत नाही की काय, तर गोळीबाराच्या घटना उजेडात येतांना दिसून येत आहे. त्यानंतर आत ड्रग्जच्या घटना उजेडात येतांना दिसून येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये अल्पवयीन मुले ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ समोर आला होता. फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लेझर लाउंज हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री दीड ते पाच वाजेपर्यंत 40 ते 50 जणांच्या एका टोळक्याने ड्रग पार्टी केली. या पार्टीत सहभागी झालेल्या काही जणांनी टॉयलेटमध्ये जाऊन ड्रग्जचे सेवन केल्याचे व्हिडिओ प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. त्यामुळे पुण्यात ड्रग्जचे मोठ्या प्रमाणावर सेवन होत आहे. तरीदेखील पोलिसांची कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. खरंतर पोलिसांनी ड्रग्जच्या होणार्‍या पार्टया उधळून लावण्याची गरज आहे. मात्र ड्रग्ज सेवनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिस जागे होत असतील तर, याचाच अर्थ पोलिसांच्याच आशीवार्दाने हे सगळे घउत आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यावर पार्टीत सहभागी झालेल्यांत गॅरेजचालक, चायनीज सेंटर चालक, खासगी कंपनीत काम करणारे नोकरदार यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष बाब म्हणजे इव्हेंट मॅनेजरच्या माध्यमातून ठरलेल्या या पार्टीत सहभागी झालेल्यांची ओळखपत्रे, वयाची मर्यादा, मद्यसेवन परवाने न पाहताच त्यांना मद्यपुरवठा केल्याची बाबदेखील उघडकीस आली आहे. या टोळक्याने साडेतीन तासांच्या पार्टीत रोख व ऑनलाइन स्वरूपात 80 ते 85 हजार खर्च केले. फर्ग्युसन रस्त्यावरील पब ड्रग प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बोबडे आणि सहनिरीक्षक पाटील यांचे निलंबन सोमवारी निलंबन करण्यात आले. मात्र केवळ निलंबन करून या बाबी सुटणार्‍या नाहीत. कारण पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात घट्ट अडकत चालले आहे. याचा विळखा ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांभोवती पडतांना दिसून येत आहे. असे झाल्यास अनेक पिढ्या बरबाद होवू शकतात, त्यामुळे वेळीच ड्रग्जचा विळखा सोडवण्याची गरज आहे.  

COMMENTS