मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा चर्चेत असतात. त्याचबरोबर अनेक अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतात, त्यां

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराच्या अनेक सुरस कथा चर्चेत असतात. त्याचबरोबर अनेक अधिकार्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होतात, त्यांच्या पुढे चौकशा होतात, ही झाली सार्वजनिक बांधकाम विभागाची पहिली बाजू. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुसर्या बाजूकडे डोळेझाक करता येणार नाही. या विभागामध्ये जसे भ्रष्ट अधिकारी आहेत, तसेच कर्तव्यदक्ष अणि प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांनी या विभागात नवनिर्मिती आणि सृजनशीलतेला वाव देत नवं काहीतरी करायचं या इच्छेने झपाटल्यासारखे काम करतांना दिसून येतात, त्यामुळे याची नोंद देखील घेण्याची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेक नव्या इमारती उभारण्याचे, अनेक महामार्ग उभारण्याचे काम करत देशाच्या, राज्याच्या प्रगतीत आपले अमूल्य योगदान देण्यात येत आहे. समृद्धीसारखा महामार्गामुळे राज्याच्या विकासाला एक नवं परिमाण प्राप्त झालं आहे. वेगवान रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा उभारून या विभागाने आपली एक वेगळीच उंची गाठली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीतील सरकारच्या शासकीय इमारती, रस्ते, मार्केट, शाळा, रुग्णालय, यासोबतच पायाभूत सोयी-सुविधा उभारणे आणि त्याची देखभाल व दुरूस्ती करणे ही कामे प्रामुख्याने या विभागाकडून करण्यात येतात. खरंतर या कामांतून एक सृजनशीलता दिसून येते. त्याचबरोबर नाविण्यपूर्ण काम करत, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपला दर्जा आणि उंची कायम राखली आहे. अर्थात या उंचीला भ्रष्टाचाराचे गालबोट लागले असले तरी, त्यामुळे संपूर्ण विभागालाच वेठीस धरणे चुकीचे आहे. या विभागामध्ये प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यात मुख्य अभियंता रणजीत हांडे आणि अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या इमारती, महामार्ग तर उभारले जातातच, पण या बरोबरच नव-नच्या मालमत्तांची उभारणी करून नवनिर्मिती केली जाते. हे प्रत्यक्ष उभारणी करताना कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे त्यातील प्रत्यक्ष कार्य करणार्या प्रामाणिक अधिकार्यांनाच माहिती, त्यामुळे या अधिकार्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
दरम्यान, एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अधिकार्यांच्या नवनिर्मिती अणि सृजनशीलतेला सलाम करत असतांना दुसरीकडे याच विभागात सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराचे कुरण समजून त्यात चरणार्या अधिकार्यांचा पर्दाफाश आम्ही वेळोवेळी करत राहूच. मात्र यानिमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन्ही बाजू जनतेसमोर आणि वाचकांसमोर मांडणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
COMMENTS