Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार रोहित पवार यांच्या कामामुळे जनतेचा विश्‍वास

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची ग्वाही

जामखेड ः आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा विश्‍वास आहे. समोर कोणीही असले तरी जनता मताधिक्याने आमदार रोहित पवार यांनाच निवडू

आमदार रोहित पवारांनी दिला मदतीचा हात
आमदार रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात
आमदार रोहित पवारांना पुन्हा धक्का !

जामखेड ः आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनतेचा विश्‍वास आहे. समोर कोणीही असले तरी जनता मताधिक्याने आमदार रोहित पवार यांनाच निवडून देईल असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. नुकतेच जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकला व पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांच्यावर केलेल्या विविध आरोपांचे उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सूर्यकांत मोरे, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, माजी उपसभापती सुधीर राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, युवक तालुक्याध्यक्ष प्रशांत राळेभात, युवक शहरध्यक्ष वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, माजी युवक तालुक्याध्यक्ष शरद शिंदे, अल्पसंख्याक तालुक्याध्यक्ष उमर कुरेशी, कार्याध्यक्ष नरेंद्र जाधव,ज्येष्ठ नेते वैजिनाथ पोले, उपाध्यक्ष हनुमंत पाटील,माजी शहरध्यक्ष राजेंद्र गोरे, युवक कार्याध्यक्ष रामहारी गोपाळचरे, सोशल मीडिया अध्यक्ष काकासाहेब कोल्हे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस बबलू शेख, तालुका उपाध्यक्ष नितिन ससाणे, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे आदी उपस्थित होते. यावेळी तालूकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर म्हणाले की, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काही लोकांच्या अति महत्वाकांक्षा जाग्या होतात. आपले वेगळे अस्तित्व, गटबाजी दाखवणारांनी पक्ष सोडला. आ रोहित पवारांवर आरोप केले. आमच्या नेत्यांवर केलेल्या आरोपाला पक्षाचे पदाधिकारी म्हणून उत्तर द्यावेच लागेल. मधुकर राळेभात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष असताना पक्षासाठी योगदान न देता उलट गटबाजीस खतपाणी घालण्याचे काम केले. लोकसभेला आतून विखेंचे ऐकुन ऐन प्रचाराच्या काळात गायब झाले तालुक्याला माहित आहे. आमदार रोहित पवार यांचे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतात त्यांच्यावर जातीयवादी आरोप करणे साफ चुक आहे. यावेळी प्रशांत राळेभात म्हणाले की प्रा मधुकर राळेभात पक्षातुन गेले मात्र आता कोणीही जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे कर्जत जामखेड तालुक्यातील आम्ही सर्व आमदार रोहित पवार यांच्याबरोबरच राहणार आहेत. आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यशैलीमुळे सध्या राज्यात धडाडीचे युवा नेतृत्व तयार होत आहे. त्यांना पाडण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे जामखेड कर्जत मतदारसंघातील गेल्या पाच वर्षांत जे काम उभे राहिलेले दिसत आहेत. सर्वसामान्य माणसाला आरोग्य सेवा, पाणी, मुलभूत सुविधा, उपलब्ध करून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील आमदार रोहित पवार यांचे काम पहाता समोरच्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे आमच्या पक्षातील मातब्बर नेते फोडुन त्यांच्याबाजूने गर्दी करू इच्छित आहेत असे अनेक पदाधिकार्‍यांनी मत व्यक्त केले.

प्रारूप आरखडा बनवतांना भाजपचे पदाधिकारी होते – जामखेड शहर प्रारूप विकास आराखडा बचाव कृती समितीच्या वतीने चुकलेला आराखडा रद्द व्हावा व आराखडा बदलण्यासाठी लढा चालू आहे.  नागरिकांच्या हितासाठीच कृती समितीचे काम आहे. मात्र आराखडा बनवतांना भाजपचेच पदाधिकारी होते व आता बचाव कृती समितीमध्ये भाजपाचेच लोक आहेत असाही आरोप करण्यात आला. आराखडयाच्या  कायदेशीर लढ्यासाठी लागणारा सर्व खर्च आ रोहित पवार यांच्यावतीने करण्यात येणार आहे.त्यासाठी व्यापारी व नागरिकांकडुन कसलीही वर्गणी गोळा करू नये असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केले.

COMMENTS