Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीगोंदा तहसीलसमोर आज जाहीर निषेध सभा

श्रीगोंदा शहर : फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव बोरुडे व सामाजिक कार्यकर्ते तसेच मंचचे पदाधिकारी मुकुंदराव सोनटक्

नगर अर्बनला फसवणारा गायकवाड अखेर पकडला
परराज्यातील ब्रँडकडून महानंदला बदनाम करण्याचे प्रयत्न
काढलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवा ः सरफराज पठाण

श्रीगोंदा शहर : फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव बोरुडे व सामाजिक कार्यकर्ते तसेच मंचचे पदाधिकारी मुकुंदराव सोनटक्के यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली  सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पुणे-येरवडा-कल्याणीनगर पोर्श कोटार कार अपघात प्रकरणी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आज सोमवारी 3 जून रोजी जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे-येरवडा-कल्याणीनगर पोर्शे कोटार कार अपघात प्रकरण, श्रीमांताचा मुलगा दारु पिऊन भरधाव वेगात गाडी चालवतो. दोन निष्पाप उच्च शिक्षीत यांना गाडीखाली चिरडून मारतो.गुन्हेगाराला अती कडक शिक्षा व्हावी मात्र लोकप्रतिनिधी-पोलिस-डॉक्टर व त्यांचे कनिष्ठ यांनी संघटीतरीत्या कर्तव्यात कसून करून संविधान-लोकशाही-कायदा-न्यायाची विटंबना केली. स्वातंत्र्यानंतर एखादे गुन्ह्याचे प्रकरणात एवढी लोकशाहीची थट्टा झाली नसेल. कोट्याधीश-पैसेवाले यांना गुन्ह्यात शिक्षा होऊ नये म्हणून न्याय देणारी सरकारी यंत्रणाच कर्तव्यात कसून करून मदत करत असेल तर गुन्हा-प्रकरणात अन्यायग्रस्त जीव गमावलेले गरीब निष्पाप यांची बाजू कोण घेणार? आपल्यावरच वेळ आली आहे असे समजा तेव्हा अन्यायाच्या वेदना समजतील. अपघात गुन्ह्यात गुन्हेगाराला मदत करणेसाठी लोकशाहीमधील न्याय देणारी सरकारी यंत्रणाच संघटीतरित्या गुंतली असेल तर प्रकरणाचा निष्पक्ष तपास चौकशी-दोषींना कडक शिक्षा होणेसाठी गुन्ह्याचा तपास मा. ना. सर्वोच्च न्यायालयाचे दोन न्यायमुर्ती साहेब यांचे नियंत्रणाखाली सीबीआय मार्फत झाला पाहिजे. निसर्गाने मानवाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क अधिकार दिले मात्र भारत देशात मनुस्मृती नावाचे ग्रंथाने ते अधिकार काढून समाजात वर्ण व जातीव्यवस्था निर्माण करून माणसामाणसात भेद-विषमता तयार करुन क्षुद्र-अतिक्षुद्र- आदिवासी तयार करुन जन्म देणार स्त्रीयांना अती तुच्छ वागणून दिली. समाजात समता प्रस्थापीत करणेसाठी बहुजन महामानवांनी जन्म घेतला तर मनुस्मृतीमुळे त्यांना छळ अपमान सहन करावा लागला काहीना मृत्युला सामोरे जावे लागले. महामानव विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 25 डिसेंबर 1927 रोजी अपमानाचा बदला घेणेसाठी महाड चवदार तळे सत्याग्रहावेळी मनुस्मृतीचे दहन केले. पुढे डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती तरतुदी उलट्या करून विज्ञानवादी भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला भारतीय लोकांना अर्पन केले. सर्व भारतीय नागरीकांना मालकाचा-राजाचा दर्जा दिला जात- धर्म-लिंग-भेद नष्ट करून मताचे पेटीतून राजाचा अधिकार दिला. आता संविधान संपवून पुन्हा शालेय शिक्षणात मनुस्मृती अभ्यासक्रम लागू करुन पुन्हा समाजात विषमता निर्माण करुन लोकशाही संपवून मानवता धर्माची सत्य धर्माची उलट चक्र फिरवायची काय ? भारतीय लोकांनी वेळीच जागे व्हा बघ्याची भूमिका घेऊ नका संविधानाचे संरक्षण करा. संविधानावर संकट आले आहे. न्यायाची विटंबना थांबवा अन्यायग्रस्ताची बाजू घ्या, जीवाची बाजी लावा, नाहीतर पोर्शे कार अपघाताप्रमाणे मरावे लागेल. मणिपूर महिला विटंबना प्रमाणे मरावे लागेल. यासाठी आज सोमवार रोजी सकाळी 11.00 वा. श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर तहसिल कार्यालयासमोर सरकारला निवेदन देणेसाठी व अन्यायकारक प्रकरणाचा निषेध करणेसाठी लोकशाहीवादी राजकीय पक्ष-सामाजिक संघटना-महिला संघटना-संविधान बचाव संघटना यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून जाहिर निषेध करावा असे निवेदन प्रशासनास दिले आहे.

COMMENTS