Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी नदी पात्रात पाणी सोडल्याचा जाहीर निषेध ः सुनील देवकर

कोपरगाव तालुका ः गेल्या दोन चार दिवसांपासून नांदूर मधमेश्‍वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसह साम

साईबाबांना 35 किलो वजनाची राखी भेट
दुकानासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी
तरुणीचा पत्ता न सांगितल्याने तिघांकडून एकास बेदम मारहाण

कोपरगाव तालुका ः गेल्या दोन चार दिवसांपासून नांदूर मधमेश्‍वर धरणांतून गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून शासनाने कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांसह सामान्य नागरिकांच्या जखमेवर जणू मीठ चोळले असल्याची भावना कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती तथा प्रगतशील शेतकरी सुनिल अंबादास देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.
माजी सभापती देवकर यांनी म्हटलें आहे की, पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असतांना पाऊस येईल या आशेने काही शेतकर्‍यांनी शेतात हजारो रुपये घालत पेरणी केली आहे परंतु अद्यापही कोपरगाव तालुक्यात म्हणावा असा पाऊस पडला नसल्याने शेतकरी राजा मेटाकुटीला आला असून अनेकांचे बोअरवेल व वहिरींनी देखील तळ गाठला आहे. तर विशेष म्हणजे कोपरगाव शहरासह गाव खेड्याना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारी पाणी साठवण तलावाने देखील तळ गाठल्यान पिण्याचा पाण्याचा मोठा यक्ष प्रश्‍न निर्माण झाला असून कोपरगाव शहरातील नागरिकांना तर 12 दिवसाआड पिण्याचा पाण्याचा पुरवठा होत असल्याने कोपरगाव कर पुरते हैराण झाले आहे.शहरातील अनके मोलमजुरी करणार्‍या कुटूंबाना आपले काम सोडुन पाणी येण्याचा दिवशी घरी बसावे लागते. त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पिकांची व  नागरिकांची पिण्याच्या पाण्याची इतकी वाईट परिस्थिती झाली असताना पाटबंधारे विभागाने गोदावरी नदीपात्रात सोडलेले जायकवाडी च्या दिशेने जाणारे हे पाणी जर गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यात सोडले असते तर परिसरातील शेतकर्‍यांना आपल्या शेतीला पाणी देता आले असते यामुळे बंद पडलेल्या विहिरी व बोअरवेल देखील सुरू झाले असते आणि विशेष म्हणजे गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणारे तलाव भरले गेलं असते या मुळे शहरासह नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न मिटला असता परंतु पाटबंधारे खात्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने नियोजन करत ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून गोदावरी उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांवर व नागरिकांवर जणू अन्याय केला असल्याची भावना देवकर यांनी व्यक्त करत पाटबंधारे विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.

COMMENTS